मौनी रॉय लवकरचं अडकणार विवाह बंधनात; होणार डेस्टिशेन वेडिंग!

लॉन्ग रिलेशनशिपनंतर मौनी रॉय बॉयफ्रेन्डसोबत करणार लग्न   

Updated: Nov 28, 2021, 03:15 PM IST
मौनी रॉय लवकरचं अडकणार विवाह बंधनात; होणार डेस्टिशेन वेडिंग!

मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहात आहेत. राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekha) यांच्यानंतर कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) लग्न करणार आहेत. त्यासोबतचं पवित्र रिश्ता फेम ‘अर्चना’ म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि  विक्की जैन (Vicky Jain)  लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यानंतर आता 'नागिन' फेम मौनी रॉयच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 

मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत सप्तपदी घेण्यासाठी तयार झाली आहे. मौनीचं लग्न कधी आणि कोठे होणरा. याचा खुलासा नुकताच सूरजच्या बहिणीने केला आहे. मौनी रॉय आणि सूरज नांबियार बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

अभिनेत्रीच्या चुलत भावाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, मौनी आणि सूरजचे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. हे लग्न दुबई किंवा इटलीमध्ये होणार आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या कूचबिहार त्यांच्या मूळ जिल्ह्यात रिसेप्शन होणार आहे.

सूरज नांबियार व्यवसायाने बँकर असून तो दुबईत स्थायिक आहे. 27 जानेवारी लग्नापूर्वी म्हणजेच 25 आणि 26 जानेवारीला लग्नापूर्वीच्या सर्व विधी संपन्न होणार आहेत. मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच मौन बाळगणाऱ्या मौनीने आजतागायत तिच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.