'अचानक दृष्टी गेली, डोळ्यात जळजळ झाली' वेदनांनी त्रस्त अभिनेत्री जस्मिन भसीन म्हणाली लेन्स 'लावताच...'

लेन्स लावताच डोळ्यात जळजळ झाली अन् मग दिसणं बंद झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून डोळ्याला पट्टी लावून अभिनेत्री वेदनाने त्रस्त आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 21, 2024, 03:34 PM IST
'अचानक दृष्टी गेली, डोळ्यात जळजळ झाली' वेदनांनी त्रस्त अभिनेत्री जस्मिन भसीन म्हणाली लेन्स 'लावताच...' title=
Actress Jasmin Bhasin cornea was damaged lost eye vision burning eyes after she wears lenses

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन तिच्या पर्सनल लाईफ आणि अली गोनीसोबतच्या रिलेशनशिपमुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री डोळ्यांच्या वेदने त्रस्त आहे. अभिनेत्रीच्या डोळ्यांचा कॉर्निया खराब झाला आहे. एका इव्हेंटमध्ये डोळ्याच्या लेन्स घातल्यानंतर तिला हा त्रास झाला. तिचे डोळे जळजळ्याला लागले आणि काही दिसत नव्हतं. गेल्या 4-5 दिवसांपासून ती वेदनांमध्ये विव्हळतेय. डॉक्टरांनी तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असून तिला बरा होण्यास 4-5 दिवस लागणार आहेत. वेदनांमुळे तिला नीट झोपही येत नाही.

या घटनेबाबत जास्मिन भसीनने ई-टाइम्सशी बोलली. तिने सांगितलं की, ती एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 17 जुलैला दिल्लीला गेली होती. तिथे तिने डोळ्यात लेन्स घातले, पण तिला त्रास व्हायला लागला. त्यामुळे तिच्या डोळ्यात जळजळ आणि वेदना होऊ लागली. 

जस्मिनने या घटनेबद्दल सांगताना पुढे म्हणाली की, तिने कार्यक्रमात चष्मा घातला आणि कामाची बांधिलकी पूर्ण केली. वेदना सहन न झाल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्यावेळी असे लक्षात आले की डोळ्यांच्या कॉर्नियाला लेन्समुळे इजा झाली आहे. यानंतर ती तेथून थेट मुंबईत आली आणि पुढचा उपचार घेतले. सध्या तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असून, पण तिला वेदनेपासून आराम मिळत नाहीय. 

जस्मिन भसीन अलीकडेच कुकिंग रिॲलिटी शो 'लाफ्टर शेफ' मध्ये दिसली होती. बॉयफ्रेंड अली गोनीसोबत ती या शोमध्ये आली होती. त्याच्याशिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक मोठे चेहरेही या शोमध्ये झळकले होते. अर्जुन बिजलानी, राहुल वैद्य, करण कुंद्रा, अंकिता लोखंडे, विकी जैन, कश्मिरा शाह, कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी, निया शर्मा, जन्नत जुबेर आणि रीम यात आहेत. शोच्या गेल्या आठवड्यातील एपिसोडमध्ये तिचे जवळचे लोक शोमध्ये आले होते. जस्मिनशिवाय तेजस्वी प्रकाश, अर्चना गौतम, क्रिस्टल डिसोझा आणि श्री फैजू हेदेखील या शोमध्ये आहेत. 

विशेष म्हणजे कुकिंग रिॲलिटी शोच्या स्ट्रिमिंगच्या वेळेत बदल करण्यात आलाय. यापूर्वी तो कलर्स चॅनल आणि जिओ सिनेमा ॲपवर शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता प्रसारित केला जात होता. पण, आता रोहित शेट्टीचा शो 'खतरों के खिलाडी 14' यावेळी प्रसारित होणार आहे. अशा परिस्थितीत 1 ऑगस्टपासून 'लाफ्टर शेफ' गुरुवार आणि शुक्रवारी रात्री 10 वाजता प्रेक्षकांना पाहिला मिळणार आहे.