2 तासांत अभिनेत्रीने बदलले 130 कपडे...याला रेकॉर्ड म्हणालं की वेडेपणा?

त्याचेच एक उदाहरण म्हणजे तिचा चित्रपट ज्यात अभिनेत्रीने 130 वेगवेगळे आऊटफिट परिधान केले होते.

Updated: Mar 12, 2022, 01:48 PM IST
 2 तासांत अभिनेत्रीने बदलले 130 कपडे...याला रेकॉर्ड म्हणालं की वेडेपणा? title=

मुंबई : बेबो नेहमीच तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. करीना कपूर खान तिच्या आऊटफिटमुळे विशेष चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या लुकसाठी विशेष मेहनत घेताना दिसते.

त्याचेच एक उदाहरण म्हणजे तिचा चित्रपट ज्यात अभिनेत्रीने 130 वेगवेगळे आऊटफिट परिधान केले होते.

2 तासांच्या या चित्रपटात करीना कपूर खानने डिझायनर्सचे 130 ड्रेस परिधान केले होते. या चित्रपटाचं नाव हिरोईन असं होते.

या चित्रपटात फिल्मी दुनियेच्या झगमगाटात दडलेल्या  सेलिब्रिटींचे पडद्यामागील आयुष्य, जे कॅमेऱ्यासमोर हसताना दिसत असले तरी प्रत्यक्षात त्यांचे आयुष्य खूप एकाकीपणातून जात आहे. अशी या सिनेमाची कहाणी दाखवण्यात आली होती.

ग्लॅमरच्या दुनियेवर बनलेला हा चित्रपट कुठेतरी चित्रपटाच्या पडद्यामागील सत्य दाखवणारा ठरला. या चित्रपटातील प्रत्येक गाणी खूप लोकप्रिय झाली. गाण्यांसोबतच करीना कपूरची स्टाईल आणि तिच्या आउटफिट्सचीही खूप चर्चा झाली.

हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. तिचे हे कपडे बॉलीवूडच्या अनेक टॉप डिझायनर्सनी डिझाइन केले होते.

पण एकीकडे अभिनेत्रीच्या या आऊटफिटबाबतची बातमी समोर येताच काहींनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत. एका सिनेमासाठी इतके कपडे अतीच आहे असं देखील ट्रोलर्सने म्हटलं आहे.