त्या व्हिडिओमुळे अभिनेत्री माहिरा खान झाली ट्रोल!

गेल्या वर्षी रईस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पु्न्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: Mar 30, 2018, 12:22 PM IST
त्या व्हिडिओमुळे अभिनेत्री माहिरा खान झाली ट्रोल! title=

नवी दिल्ली : गेल्या वर्षी रईस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पु्न्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी रणबीर कपूर सोबत परदेशातील रस्त्यांवर स्मोकींक करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा तिचे स्मोकींगचे व्यसन सर्वांसमोर आले आहे. या व्हिडिओत माहिरा कोणत्यातरी शो पूर्वी सिगरेट पितानाचा व्हिडिओ समोर आला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. अनेकांना माहिराचे हे स्मोकींगचे व्यसन भावले नाही. तर माहिराला अशाप्रकारे टारगेट केल्यामुळे काही लोकांनी या सगळ्याला विरोध केला आहे.

काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या फ्रेंडच्या लग्नाला हजेरी लावली होती. तिथे तिने बॉलिवूडच्या गाण्यांवर ठुमके लावले. तिचे हे व्हिडिओज देखील व्हायरल झाले होते. यातील तिचा डान्स अनेकांना भावला.

माहिरा लवकरच '7 दिन मोहब्बत इन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.