कपिलचा शो चाहत्यांना नाही भावला, होणार 'पत्नी'ची एन्ट्री ?

'कॉमेडी टाइम विथ कपिल शर्मा' च्या निर्मात्यांनी सुमोनाला संपर्क केल्याची चर्चाही सध्या रंगू लागली आहे.

Updated: Mar 30, 2018, 11:38 AM IST
कपिलचा शो चाहत्यांना नाही भावला, होणार 'पत्नी'ची एन्ट्री ?  title=

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माने २५ मार्चपासून 'कॉमेडी टाइम विथ कपिल शर्मा' शोतून पुन्हा वापसी केली आहे. पण सुरूवातीलाच त्याची सोशल मीडियात खूप खिल्ली उडविण्यात आली. सुनील ग्रोव्हर आणि सुमोना चक्रवर्ती शोचा भाग नसल्याने दर्शकांना कॉमेडी काही पसंत पडत नाहीए.  सुमोना 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' मध्ये कपिल शर्माच्या पत्नीच्या भुमिकेत दिसली. दोघांमध्ये होणारी भांडण प्रेक्षकांना अधिक आवडत असत. शो मध्ये ती डॉ. मशहूर गुलाटी (सुनील ग्रोव्हर) ची मुलगी बनली, तिला कपिल शर्मा आवडत असतो. 

कपिल-सुमोनाची भांडणं 

'कॉमेडी टाइम विथ कपिल शर्मा' च्या निर्मात्यांनी सुमोनाला संपर्क केल्याची चर्चाही सध्या रंगू लागली आहे. दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.

सुमोना हा शो करायला मान्य झाली तर कपिल आणि सुमोनाची भांडण त्यांचे चाहते पुन्हा एन्जॉय करू शकतील. कदाचित यामुळे तरी नव्या शोकडे प्रेक्षक येईल अशी आशा बाळगली जात आहे. 
 
 नव्या शोमध्ये चंदन प्रभाकर, कीकू शारदा आणि सिद्धू दिसणार आहेत. सुमोना याचा भाग नव्हती. कलर्सचा थ्रिलर शो 'देव'मध्ये ती अखेरची दिसली होती.