अभिनेत्री मानसी नाईकचं यंदा कर्तव्य

मानसी नाईकच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.  

Updated: Dec 22, 2020, 07:52 AM IST
अभिनेत्री मानसी नाईकचं यंदा कर्तव्य

मुंबई : मराठी कलाविश्वात अनेक लावण्यांवर ठेका धरून सर्वांना आपल्या नृत्याने घायाळ करणारी अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा झाल्याचे जाहीर करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने साखरपुड्याची माहिती दिली. Engaged Future Mrs. Kharera म्हणतं तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले. आता तिच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

19 जानेवारी 2020 मध्ये ती बॉक्सर प्रदीप खरेरासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. विवाहाची माहिती देत ती म्हणाली, '19 जानेवारीला मी आणि प्रदीप खरेरा लग्न करणार आहोत. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितित लग्नसोहळा रंगणार आहे.' 18 जानेवारी रोजी हळदीचा कार्यक्रम रंगणार आहे. 

दरम्यान, 'बघतोय रिक्षावाला' आणि 'बाई वाड्यावर या' फेम मानसीने साखरपुडा देखील अत्यंत साध्य पद्धतीत साजरा केला. फक्त ६ लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. यावेळी मानसीचे कुटुंबिय आणि मानसीची अतिशय जवळची मैत्रिण अभिनेत्री दिपाली सय्यद होती.