Mithun Chakraborty यांची तब्येत बिघडली, मध्येच थांबवावी लागली शूटींग

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty)यांची तब्येत अचानक बिघडली

Updated: Dec 21, 2020, 03:32 PM IST
Mithun Chakraborty यांची तब्येत बिघडली, मध्येच थांबवावी लागली शूटींग

नवी दिल्ली : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty)यांची तब्येत अचानक बिघडली. मसूरी येथे असताना त्यांची तब्येत बिघडली. ते सध्या 'कश्मीर फाइल्स' (Kashmir Files) च्या शुटींगसाठी मसूरी येथे आहेत. फूड पॉयझनिंगमुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येतंय. 

तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उभे देखील राहता येत नव्हते. आपला शॉट पूर्ण होण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. विवेक रंजन अग्नीहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स'ची शूटींग सुरु असताना मिथून चक्रवर्ती अचानक खाली पडले. यामुळे सिनेमाची शूटींग थांबवावी लागली. 

मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) मोठ्या पडद्यावर शेवटचे २०१९ मध्ये दिसले होते. विवेक अग्निहोत्री 'ताश्कंद फाइल्स'मध्ये दिसले. हा सिनेमा माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित होता.