वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी अभिनेत्री शोधतेय सुंदर मुलगी; व्हिडीओ केला शेअर

मनिषाने शोमध्ये केवळ आपल्या डान्सच नव्हे तर आपल्या अभिनयानेदेखील चाहत्यांची मने जिंकली होती. सध्या अभिनेत्री तिच्या गावी बिहारमध्ये आहे. 

Updated: Mar 26, 2024, 05:14 PM IST
वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी अभिनेत्री शोधतेय सुंदर मुलगी; व्हिडीओ केला शेअर title=

मुंबई :  अभिनेत्री मनिषा रानी 'झलक दिखला जा 11' जिंकल्यापासून खूप खुश आहे. मनिषाने शोमध्ये केवळ आपल्या डान्सच नव्हे तर आपल्या अभिनयानेदेखील चाहत्यांची मने जिंकली होती. सध्या अभिनेत्री तिच्या गावी बिहारमध्ये आहे. तिथे मनिशा आपल्या परिवारासोबत खूप धमाल करताना दिसत आहे आणि पार्टीदेखील करताना दिसतेय. व्हिडीओ व्लॉगच्या माध्यमातून अभिनेत्रीने सांगितलं की, मुंगेर मध्ये तिचं कसं स्वागत करण्यात आलं आणि तिला काय काय गिफ्ट मिळाले. मात्र यादरम्यान तिने मस्तीच्या अंदाजात सांगितलं की, तिचे वडिल दुसरं लग्न करु ईच्छितात. त्यांच्यासाठी कोणी महिला असेल तर सांगा. इतकंच नाही तर एक्साइटमेंटमध्ये  मनीषा आणि तिचे वडिल चुकून खरा नंबर देतात. 

Manisha Rani ने मुंगेरमध्ये व्हिडीओ ब्लॉग बनवला आणि नंतर सगळ्या बहिणींना खोलीत बोलवून गिफ्ट बघू लागली. या सगळ्या दरम्यान घरातल्या अनेक सदस्यांनी राणीला पैसेदेखील दिले. व्लॉगमध्ये मनिषा सेलिब्रेशनची पुर्ण कहाणी सांगत आहे आणि तेव्हाच प्रमोद कुमारदेखील येतात जे मनिषाची नक्कल करु लागतात. 
 
मनिषा आणि तिच्या बहिणी वडिलांसोबत खूप मस्ती करतात. यादरम्यान मनिषाने व्लॉगमध्ये चाहत्यांना सांगितलं की, त्यांचे बाब आपल्या डोक्यावर केस आणू ईच्छितात आणि यासाठी चाहते कमेंटमध्ये असं हेअर ऑईल सांगतात ज्याने केस येतात, नंतर ती मस्करीत बोलते की, तिच्या बाबांना लग्न करायचं आहे. 
 
मनिषा म्हणाली, 'माझ्या वडिलांना डोक्यावर केस हवे आहेत, प्लिज मला कमेंटमध्ये कोणीतरी उत्तम तेल सांगा. पप्पा त्यांच्या लग्नासाठी एक सुंदर मुलगी शोधत आहेत. क्षमस्व, मुलगी नाही तर एक स्त्री शोधत आहे कारण वडील आता मुलीच्या वयाचे नाहीत. जर कोणी महिला असेल जी माझ्या वडिलांची साथ निभवू शकतं तर मला कळवा. कमेंट किंवा DM करा. माझ्या वडिलांचा नंबर 943044 आहे...' यानंतर मनीषा आणि तिचे वडील चुकून फोन नंबर सांगतात. 

५ वर्षांची असताना मनिषाच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला
आम्ही तुम्हाला सांगतो की, मनीषा रानी जेव्हा ५ वर्षांची होती तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर वडिलांनीच त्यांच्या मुलांचं संगोपन केलं. नुकतीच  मनीषा रानीने 'झलक दिखला जा 11'मध्ये सांगितलं होतं की, आत्तादेखील ती तिच्या आईला भेटते. मनिषा रानी आज स्टार बनली आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी तिने खूप स्ट्रगल केला आहे