Big Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती

Maharashtra Assembly Winter Session :  लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.   

वनिता कांबळे | Updated: Dec 19, 2024, 04:29 PM IST
 Big Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती title=

Ladki Bahin Yojana :   मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वसान महायुती सरकारने दिले आहे. अशातच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाडक्या बहिणांना प्रश्न पडला आहे तो  डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  याबाबत अत्यंत महत्वाची माहिती जाहीर केली आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंधराशे रुपयांचे एकविसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे.   विधानसभेच्या पहिल्याच दिवशी नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला होता. हिवाळी अधिवेशानात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयांवरुन एकवीसशे रुपये करु असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यात  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. महायुती सरकारने सुरु केलेली एकही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृत सांगितले. 

लाडकी बहिण या योजनेच्या निकषात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीयेत. यामुळे ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सरकार करणार असल्याची माहिती समोर आली होती. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे.ज्यांच्या घरी कार आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात येत होतं.

जुलै 2024 पासून लाडकी बहिण योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत.  कोट्यावधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतला आहे. 1500 रुपये या प्रमाणे तीन महिन्यांचे मनाधन तसेच 3 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देखील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.