Vastu Tips: 'या' दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे मानलं जातं शुभ, महत्त्वाचा कामात राहते सकारात्मक ऊर्जा

Vastu Tips Wearing Red Clothes Day : लाल रंग हा धोका असल्याचं संकेत देतो. मात्र ज्योतिषशास्त्रात लाल रंग हा शुभ मानला जातो. प्रत्येक रंगांचं शास्त्रात वेगवेगळा प्रभाव सांगण्यात आलंय. लाल रंग आठवड्यातील कोणत्या दिवशी घातला पाहिजे तुम्हाला माहितीये का?

नेहा चौधरी | Updated: Dec 19, 2024, 04:34 PM IST
Vastu Tips: 'या' दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे मानलं जातं शुभ, महत्त्वाचा कामात राहते सकारात्मक ऊर्जा title=

Vastu Tips Wearing Red Clothes Day : रंग हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. रंगांशिवाय आपलं आयुष्य बेरंग असतं. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये रंग आहे. वास्तूशास्त्रात रंगांना अतिशय महत्त्व आहे. या रंगांचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. सप्तरंगातील प्रत्येक रंगाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. पांढरा रंगाचे कपडे हे सोमवारी परिधान केले जातात. तर लाल रंग हा धोक्याचे प्रतिक मानले जाते. पण वास्तूशास्त्रात लाल रंग हा शक्तिशाली मानला जातो. शिवाय लाल रंग हा सूर्यदेवता आणि अग्निदेवतेला प्रिय आहे. शास्त्रात असं सांगितलं की, तुम्ही ज्या रंगाचे कपडे परिधान करतात त्याचा देव आणि ग्रहांचा चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. माणसाची प्रगती दिवसेंदिवस दुप्पट होत, आत्मविश्वास मजबूत होतो. चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते पाहूयात. 

'या' दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे मानलं जातं शुभ

ज्योतिषी प्रितिका मोजुमदार या सांगतात की, शुक्रवारी आणि मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान करणे अतिशय शुभ मानले जातात. कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस असून लाल रंग हा देवा आवडतो. या दिवशी लाल वस्त्र धारण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. आर्थिक फायद्यासह प्रगती मिळते. मंगळवारीही लाल रंगाचे कपडे घालणे शुभ असतं. यामुळे सूर्यदेवाची तसंच हनुमानजींची कृपा प्राप्त होते. यामुळे यादिवशी कुठल्याही कामात यश मिळतं. 

लाल रंगाचे कपडे परिधान करण्याचे फायदे काय?

लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने माणसाचे नशीबच उजळतं अशी मान्यता आहे. सूर्यदेव आणि हनुमानजींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. यामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. लाल रंग मंगळाच्या सर्वात आवडत्या रंगांपैकी एक आहे. या दिवशी या रंगाचे कपडे परिधान केल्यास अशुभ प्रभावापासून आराम मिळतो. आयुष्यात येणारी कोणतीही नकारात्मकता नष्ट होऊन धैर्य वाढवतं, असं शास्त्रात सांगण्यात आलंय.

आत्मविश्वास वाढण्यासोबतच लाल रंग धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक मानला गेलाय. ते व्यक्तीमध्ये ऊर्जा प्रसारित करते. यामुळे त्या व्यक्तीला कुणापुढे झुकावे लागत नाही. नेतृत्व क्षमता मंगळवारी लाल रंगाचे कपडे घालणे खूप शुभ असते. यामुळे बजरंगबली प्रसन्न होतो. उद्दिष्टे साध्य होतात. व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे माणसाची नेतृत्व क्षमतेत वाढ पाहिला मिळते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)