#MeToo अभियानावर अभिनेत्री मौनी रॉयनं सोडलं मौन

 'मी टू' नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास सिनेमा आणि टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय हिने व्यक्त केलायं.

Updated: Oct 14, 2018, 07:58 PM IST
#MeToo अभियानावर अभिनेत्री मौनी रॉयनं सोडलं मौन  title=

मुंबई : देशभरात सुरू असलेले 'मी टू' नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास सिनेमा आणि टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय हिने व्यक्त केलायं. आपल्या आयुष्यात झालेल्या अन्यायाबद्दल बोलायला हवं. जर त्या आता बोलणार नाहीत तर मग कधी ? असा प्रश्न तिने उपस्थित केलायं.

मौनीला विश्वास

काही प्रकरण न्यायालयात न्यायला हवीत कारण त्यांना खूप वर्षे झाली आहेत. पुरुष असो किंवा महिला ज्यांनी कोणी अन्याय सहन केलाय त्यांनी समोर येऊन बोलायला हवं. इतर अभियानाप्रमाणे हे अभियान अयशस्वी होणार नाही असा विश्वासही तिनं व्यक्त केलाय.

नवा सिनेमा 

केवळ सिनेसृष्टीचं नाही तर लहान मुलांनाही लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो कारण ते पुढे येऊन याविषयी बोलू शकत नाहीत.

सध्या मौनी आपला आगामी सिनेमा 'मेड इन चायना' च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. येत्या स्वातंत्र्य दिनादिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

हाऊसफूल वादात 

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo चळवळ सुरु झाली. तनुश्रीने नानांवर 10 वर्षापूर्वी रिलीज झालेला सिनेमा हॉर्न ओके प्लीजच्या शूटिंगदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

यानंतर बॉलिवूडमध्ये 2 गट पडले आहेत. काही जण तनुश्रीच्या बाजुने आहेत तर काही जण नानांच्या बाजुने उभे आहेत. साजिद खान आणि नाना पाटेकरांवर आरोप झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने हाऊसफूल 4 सिनेमाचं शूटींग थांबवण्याची मागणी केली आहे.

नानांच्या जागी संजय दत्त ?

साजिद खाननंतर आता नाना पाटेकर देखील हाउसफुल 4 सिनेमातून वेगळे झाले आहेत. आता अशी माहिती येते आहे की, नानांची जागा संजय दत्त किंवा अनिल कपूर घेऊ शकतात. या दोन्ही नावांवर सध्या विचार सुरु आहे.

संजय दत्त लवकरच सिनेमात दिसण्याची शक्यता आहे.

संजय दत्तकडे सध्या सिनेमा नाही आहे. इतर सिनेमांचं शूटींग देखील पूर्ण झालं आहे. त्यामुळे संजय दत्तच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

साजिद खान बाहेर झाल्यानंतर त्य़ाच्या जागी साजिद-फरहादची जोडी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.