पोल डान्समुळे अभिनेत्री ट्रोलर्सच्या जाळ्यात, पाहा व्हिडिओ

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. 

Updated: Jan 14, 2022, 06:58 PM IST
पोल डान्समुळे अभिनेत्री ट्रोलर्सच्या जाळ्यात, पाहा व्हिडिओ

मुंबई : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलने सोशल मीडियावर नेहमीच खळबळ माजवणाऱ्या निया शर्माचे लाखो चाहते आहेत. जे तिच्या लुकचं कायम कौतुक करत असतात.  आणि तिच्या प्रत्येक अपडेटवर चाहते लक्ष ठेवतात. निया शर्माचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. नियाने तिचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती जबरदस्त पोल डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये निया पोल डान्सचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने काळी शॉर्ट्स आणि स्पोर्ट्स ब्रा घातली असून ती पोलवर सराव करत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये आपली व्यथाही मांडली आहे. व्हिडिओ शेअर करत नियाने लिहिलं की, 'असं दिसतंय की हाडं तुटतील. पण, सर्वोत्तम भाग म्हणजे प्रेरणा.

नियाच्या या व्हिडिओवर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करणारे काही लोकं तिची स्तुती करत आहेत. तर काही तिला ट्रोल करत आहेत आणि डान्स न करण्याचा सल्ला देत आहेत. नियाच्या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, 'तू अप्रतिम आहेस. उत्कृष्ट' तर दुसर्‍या युजरने लिहिलं 'उत्तम काम. तुम्हाला लेव्हल 10 करणं आवश्यक आहे.

नियाच्या व्हिडिओवर कमेंट करत काही जण तिच्या डान्सिंग स्किल्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एकाने कमेंट करून लिहिलं, 'सावध राहा, जर तुम्ही पडाल तर तुमची हाडे तुटतील.' तर दुसऱ्याने लिहिलं, 'अजिबात चांगलं दिसत नाही.'  पण, आता तिला ट्रोल करायला हरकत नाही, असं अभिनेत्रीने आधीच स्पष्ट केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकताच नियाचा नवीन म्युझिक व्हिडिओ 'फुंक ले' रिलीज झाला आहे, जो सगळीकडे गाजला आहे. नियाची बोल्ड स्टाईल पुन्हा एकदा म्युझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. जी तिच्या चाहत्यांमध्ये खूप आवडत आहे.