स्वत:ला कोंडलेल्या मलायकाने घेतला मोकळा श्वास, या व्यक्तीसोबत दिसली फिरताना

ज्यामुळे अनेकदा ही जोडी नेटीझन्सकडून ट्रोल देखील झाली आहे.

Updated: Jan 14, 2022, 05:25 PM IST
 स्वत:ला कोंडलेल्या मलायकाने घेतला मोकळा श्वास, या व्यक्तीसोबत दिसली फिरताना

मुंबई :  अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा ही अर्जुन कपूरला डेट करु लागली. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत.

सोशल मीडियावर देखील चाहते, या जोडीला पसंत करतात. दोघांना अनेकदा पार्टीमध्ये एकत्र पाहिले जाते. अर्जुन आणि मलायका या दोघांच्या वयात खुप जास्त अंतर आहे. मलायका अर्जुनपेक्षा वयाने मोठी आहे. ज्यामुळे अनेकदा ही जोडी नेटीझन्सकडून ट्रोल देखील झाली आहे.

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, ब्रेकअपच्या चर्चेनंतर गेल्या सहा दिवसांपासून मलायका घरातून बाहेर पडलेली नाही. ती पूर्णपणे एकांतात गेली आहे. मलायका खूप दुःखी आहे आणि तिला काही काळ जगापासून दूर राहायचे आहे, असे बोलले जात आहे.

आठवडाभर घरात बंदिस्त राहिल्यानंतर नुकतीच मलायका अरोरा पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी तिचा मुलगा अरहानही संध्याकाळी मलायकासोबत बाहेर पडल्याचं दिसलं, जो जबरदस्त स्टाइलने घराबाहेर पडला.

अरहान सध्या भारतात आहे आणि तो त्याच्या आईसोबत वेळ घालवत आहे. त्यामुळे मलायका आणि अरहान इव्हिनिंग वॉकला बाहेर पडल्याचं दिसून आलं. या दरम्यान मलायका आणि अरहान सोबत त्यांचा पेट डॉग होता,  दोघेही घराबाहेर फिरण्यासाठी निघाले होते.

यावेळी अरहान खानने स्टायलिश चेक शर्ट घातला होता, गेल्या ६ दिवसांपासून मलायका घरातून बाहेर पडत नव्हती. बुधवारी दिवसभर तिच्या आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत होत्या.

अखेर अर्जुन कपूरने पोस्टद्वारे या बातम्यांचे खंडन केले. त्यांनी या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.