मुंबई : ऐतिहासिक कणखर भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारया अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सिंपल आणि गोड अंदाज आगामी 'सिंगल' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. अमृता ही व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारणार आहे. २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या 'सिंगल' चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी केले आहे.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना प्राजक्ता सांगते, 'कॉलेजकट्टा त्यातली धमाल असा हा चित्रपट आहे. मी आजवर कॉलेजगोईंग भूमिका साकारली नव्हती. अतिशय साधीसरळ मुलगी मी यात साकारली असून, 'सिंगल' चित्रपटाच्या निमित्ताने मला वेगळ्या जॉनरची भूमिका करायला मिळाल्याचा आनंद आहे. प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे या सहकलाकारांसोबत मी पहिल्यांदाच काम केलं असून या चित्रपटात आम्ही 'फुल ऑन कल्ला' केला आहे. मी चित्रपटात 'सिंगल' राहणार की 'मिंगल' हे बघणं प्रेक्षकांसाठी धमाल अनुभव असणार आहे.
किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक हे 'सिंगल' या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच ती तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. प्राजक्ताने सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करताच ती काहीच वेळात चर्चेत येते.
प्राजक्ता गायकवाड ही 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरातून पोहचली होती. तिचे इन्टाग्रामवरही अनेक फॉलोवर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते.मध्यंतरी प्राजक्ता काही मालिकांमधून दिसली होती. आता लवकरच अभिनेत्रीचा सिंगल हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.