'या' कारणासाठी नकोय प्रार्थना बेहरेला मूल; केला मोठा खुलासा

आपल्या अभिनयामुळे प्रार्थना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. अनेकदा प्रार्थना तिच्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असते. 

Updated: Apr 18, 2024, 04:06 PM IST
'या' कारणासाठी नकोय प्रार्थना बेहरेला मूल; केला मोठा खुलासा title=

मुंबई : अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रार्थना घरा-घरात पोहचली. यानंतर अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली ती म्हणजे झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील तिच्या अभिनयाला विशेष पसंती मिळाली. कायमच आपल्या अभिनयामुळे प्रार्थना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. अनेकदा प्रार्थना तिच्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असते. नुकतीच प्रार्थनाने दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुलांविषयी खुलासा केला आहे. 

नुकतीच प्रार्थनाने सुलेखा तळवलकर यांना मुलाखत दिली. प्रार्थनाने सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. प्रार्थनाने मुंबई सोडून अलिबागला जाण्याच्या निर्णयावर बोलताना म्हणाली, ' अलिबागला आधीपासूनच आमची बरीच जागा आहे. ही जागा माझ्या नवऱ्याच्या आजोबांची होती. जवळ-जवळ कोव्हिडच्या दोन वर्षं आधी आम्ही असं ठरवलं कि, ती जागा आपण डेव्हलप करायला हवी आणि आम्ही सुरुवात केली.

यानंतर रो-रो बोटला सुरुवात झाली. तिथे आम्ही बरेच प्राणी पाळले आहेत. त्यामुळे अभिला आठवड्यातून चार दिवस तिथे जावं लागायचं. मी तेव्हा जुहूला राहायची. त्यावेळी माझी मालिका सुरु होती त्यामुळे मला इथेच राहावं लागायचं. मग आम्ही ठरवलं कि आपण शिफ्ट होऊया. पण, त्यानंतर असं वाटायचं अरे मुंबईत तशी मजा नाही.नुसती गर्दी, ट्राफिक एकीकडून दुसरीकडे जायचं त्यामुळे मला स्वत:लाही वेळ देता यत नव्हता. यानंतर आम्ही अलिबागला जायचा निर्णय घेतला. अलिबाग जाऊन समाधान मिळेल असं आम्हाला वाटलं.  यामुळेच आम्ही कायमस्वरुपी तिथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून अलिबागला राहण्यासाठी माझे सासू-सासरे सुद्धा तयार झाले.

इतक्या सुंदर वातावरणात त्यांचं आयुष्य आणखीनच वाढल्याचं मला वाटतं. ते दोघं तिथे खूप सुखी-समाधानी आहेत. मी तिथे मेकअपशिवाय फिरू शकते, झाडांची काळजी घेते. माझी पेंटिग्जची आवड जपते. प्रवासाच्या दृष्टीने थोडासा त्रास झाला पण पण आता सवय झालीये. आता काहीच वाटत नाही. आता आम्हाला तिथे एक वर्ष पूर्ण होईल.'' असं प्रार्थना दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

पुढे प्रार्थना मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर म्हणाली, 'मल मूल नको होत त्याऐवजी मला खूप पेट्स हवे होते. जेव्हा माझं अभीशी लग्न ठरलं तेव्हा त्याचीही हीच इच्छा असल्याचं मला समजलं आणि आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि आता आम्ही आमच्या या मुलांची काळजी घेतोय आणि यासाठी आमच्या कुटूंबाचा पूर्ण पाठींबा होता.' प्रार्थनाचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.