'या' सेलिब्रिटी किड्सना कमी वयातचं मिळतय क्रिकेटचं बाळकडू

या सेलिब्रिटी किड्सचं पंजाब संघासोबत खास कनेक्शन, कोण आहेत ते सेलिब्रिटी ज्यांची लहान वयातचं घेत आहेत क्रिकेटचं बाळकडू  

Updated: Mar 28, 2022, 03:35 PM IST
'या' सेलिब्रिटी किड्सना कमी वयातचं मिळतय क्रिकेटचं बाळकडू title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 ला सुरुवात झाली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाने तिच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही अगदी आनंदाने बेडवर झोपलेले आहेत. दोघे ही समोरच्या टीव्हीकडे बघत आहेत जणू काही त्यांना सर्वकाही समजले आहे. 

फोटोवरून समोर येत आहे की, प्रितीने लहानपणीचं जुळ्या मुलांना क्रिकेटचे बाळकडू देण्याचस सुरूवात केली आहे. प्रितीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'नवीन टीम.... नवे कॅप्टन आणि नवे चाहते...' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रितीने पोस्ट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र प्रिती आणि तिच्या मुलांची चर्चा आहे. याआधी देखील प्रितीने मुलांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. तेव्हा देखील चर्चांना उधाण आलं होतं.