घरातले वाद सोडून प्रियांकानं परिणीतीसाठी उचललं मोठं पाऊल, लग्नाच्या दिवशी व्यक्त केली 'ही' इच्छा

Parineeti Chopra and Raghav Chaddha: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची. यावेळी प्रियांका चोप्रा ही आपल्या बहिणीच्या लग्नाला अनुपस्थित राहणार आहे. त्यामुळे आता प्रियांकानं इन्टाग्रामवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 23, 2023, 11:45 AM IST
घरातले वाद सोडून प्रियांकानं परिणीतीसाठी उचललं मोठं पाऊल, लग्नाच्या दिवशी व्यक्त केली 'ही' इच्छा title=
actress priyanka chopra expresses love for her bride to be sister prineeti chopra

Parineeti Chopra and Raghav Chaddha: परिणीती चोप्रा हिच्या लग्नाची सध्या सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यात आता चर्चा आहे ती म्हणजे प्रियांका चोप्रा हिची. कारण आपल्या लाडक्या बहीणीसाठी तिनं खास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी आपल्या घरगुती कलहामुळे प्रियांका चोप्रा ही परिणीतीच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीये अशी चर्चा रंगलेली आहे. तेव्हा आता त्यामुळे तिची सोशल मीडिया जोरात चर्चा आहे. तिच्या दीराचा आणि जाऊबाईंचा घटस्फोट होतो आहे त्यामुळे सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा रंगलेली असते. त्यात आता प्रियांकाच्या एका पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.

यावेळी तिनं परिणीती चोप्रासाठी खास मेसेज लिहिला आहे. यावेळी तिनं आपल्या लाडक्या बहीणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यावर्षी 13 मे रोजी परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी प्रियांकानंही हजेरी लावली होती. 

त्यामुळे तिचीही जोरात चर्चा होती. यंदा मात्र परिणीतीच्या लग्नाला प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे काही उपस्थित राहू शकणार नाही आहेत. आपल्या बहिणीच्या लग्नात अनुपस्थित राहिल्यामुळे आता प्रियांकानं सोशल मीडियावरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : 'मन्नतमध्ये कधी पाल येते का?' नेटकऱ्याच्या आगाऊ प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

यावेळी प्रियांका म्हणते की, 'आज तु तितकीच आनंदी आणि खुश राहा जशी तु नेहमी राहतेस कारण आज तुझा खास दिवस आहे. तेव्हा आजपासून तुझी आणि राघवची नवी इंनिंग सुरू होते आहे. तेव्हा तुला तु खूप खूप शुभेच्छा' सध्या प्रियांकानं तिचा फोटोही खाली शेअर केला आहे. आता सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची. 

सध्या परिणीती आणि राघव यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे यावेळी हॉटेल लिला पॅलेसमधीलही काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काल राघव आणि परिणीती चोप्रा हे उदयपूरसाठी रवाना झाले होते. त्यांचे एअरपोर्टवरील फोटोही व्हायरल झाले आहेत. आता त्यांच्या सेरेमनी या लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहेत. त्यांच्या लग्नाच्या लोकेशनचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.