Kharghar Turbhe Link Road : सायन पनवेल मार्ग हा फक्त मुंबईच नाहीच तर ठाण्याचे देखील प्रवेशद्वार आहे. यामुळे सायन पनवेल मार्गावर नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते. मुंबई-ठाण्याहून खारघर किंवा नवी मुंबईला जायचे असेल तर सायन पनवेल मार्गशिवाय पर्याय नाही. प्रवाशांना वाहतूक कोंडीतुन सोडवण्यासाठी सिडको सायन पनवेल मार्गाजवळ गुप्त रस्ता बांधत आहे. हा गुप्त रस्ता खारघर-तुर्भे लिंक रोड आहे. सिडकोचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत सायन पनवेल मार्गाखाली बोगदा बांधला जाणार आहे. यामुळे खारघर तुर्भे 15 किलोमीटरचे अंतर फक्त 5 किलोमीटरवर येणार आहे.
सायन पनवेल महामार्गावर दिवसाला दोन लाखहून अधिक वाहनं धावतात, ठाणे, बेलापूर, पामबीच आणि शीव पनवेल या मार्गावरील ट्र्रॅफिक कमी करण्यासाठी सिडको महामंडळाने खारघर-तुर्भे लिंक रोड हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. खारघर तुर्भे लिंक रोड मुळे मुंबई - ठाण्याहून अवघ्या 10 मिनिटांत अंतर पार करता येणार आहे. या प्रवासासाठी सध्या 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागतो.
वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, एपीएमसी मार्केट, टीटीसी औद्योगिक वसाहत यांना खारघर-तळोजाला थेट केनक्टीटीव्हीसाठी खारघर-तुर्भे लिंक रोड हा बांधला जात आहे. तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक डोंगराखालील 1.76 किमीचा बोगदा बांधला जाणार आहे. हा लिंक रोड तुर्भे येथून सुरू होणार आहे. डोंगर फोडून जुईनगर मार्गे खारघरकडे जाणारा रस्ता बांधला जाणार आहे. तुर्भे येथून खारघला जाण्यासाठी बेलापूर रोड आणि पाम बीच रोडमार्गे जाता येते. हे अंतर 15 किलोमीटर इतके. खारघर तुर्भे लिंकरोडमुळे हे अंतर फक्त 5 किलोमीटर येणार आहे त्यामुळे प्रवासाचा वेळ 40 मिनिटांपासून 10 मिनिटांपर्यंत वाचणार आहे.
या प्रकल्पाची योजना यापूर्वी एमएसआरडीसीने केली होती. मात्र, हा प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. खारघर तुर्भे लिंक रोड हा 5.4 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. खारघर- तुर्भे जोड मार्गाच्या कामाला खारघरमधून सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाअंतर्ग खारघरवरून तुर्भे आणि तुर्भेमार्गे खारघरमध्ये प्रवेश करताना सेंट्रल पार्ककडून तळोजा कारागृहकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जवळपास दीड किलोमीटर लांबीचा पूल उभारला जाणार आहे. पूल उभारणीसाठी गुरुद्वारासमोरील रस्त्यावर खोदकाम सुरू झाले आहे. सेंट्रल पार्कमधून खारघर कार्पोरेट पार्कमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी दोन हजार 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2028 पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे.