प्रियांकाला पाहून निक दाजी बेभान; का आली लिपस्टीक पुसण्याची वेळ?

निक याची तिच्यावरुन नजरच हटत नव्हती. 

Updated: Dec 7, 2021, 06:14 PM IST
प्रियांकाला पाहून निक दाजी बेभान; का आली लिपस्टीक पुसण्याची वेळ?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं बॉलिवूडमध्ये नाव कमवल्यानंतर आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. परदेशामध्ये जाऊन प्रियांकानं आपली नवी ओळख निर्माण केली. पुढे अमेरिकन गायक, निक जोनास याच्याशी ती विवाहबंधनात अडकली. 

निक आणि प्रियांका यांनी त्यांच्या नात्यातून सातत्यानं चाहत्यांना कपल गोल्स दिले. पण, मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी जोर धरला होता. 

अखेर खरं काय ते उघड झालं. प्रियांका आणि निक घटस्फोट घेणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्यातच आता या सेलिब्रिटी जोडीचा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. 

फॅशनच्या बाबतीत प्रियांकानं कायमच नवे ट्रेंड आपलेसे केले आहेत. विविध पुरस्कार सोहळ्यांना तिचा फॅशन सेन्स पाहायला मिळतो. 

अशाच एका सोहळ्याच्या वेळी प्रियांका ऑफ शोल्डर लाईट पर्पल शेडमधील एका आऊटफिटमध्ये आली आली. 

देसी गर्लचा हा लूक इतका प्रभावी होता, की तिचा पती निक याची तिच्यावरुन नजरच हटत नव्हती. 

निकनं सर्वांसमोरच प्रियांकाला किस केलं. पत्नीचं सौंदर्य पाहून तिला किस करणाऱ्या निकवर यावेळी सर्वांच्या नजरा खिळल्या. 

किस केल्यानंतर निकच्या ओठांवर प्रियांकाची लिपस्टीक लागली होती. जे पाहून तिनं हळूच ही लिपस्टीक मिटवण्याचा प्रयत्नही केला. कॅमेऱ्यामध्ये या जोडीच्या या अदा आणि अफलातून केमिस्ट्री कैद झाली आणि व्हायरलही झाली होती.