मला आमिर आवडायचा, पण...; बॉलिवूड अभिनेत्रीनं नेमका आताच का केला हा उलगडा?

अनेक वर्षांनंतर सांगणारी ही अभिनेत्री आहे.... 

Updated: Nov 8, 2021, 12:49 PM IST
मला आमिर आवडायचा, पण...; बॉलिवूड अभिनेत्रीनं नेमका आताच का केला हा उलगडा? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी चित्रपट जगतामध्ये परफेक्शनिस्ट, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान यानं कायमच प्रेक्षकांना थक्क केलं आहे. चित्रपट असो किंवा मग एखादा उपक्रम, आमिरनं क्षणोक्षणी आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. त्याच्या चाहत्यांचा आकडाही तुलनेने मोठा. त्याच्या चाहत्यांच्या गर्दीत एका अभिनेत्रीचाही समावेश होता.

'गुलाम' या चित्रपटाच्या वेळी आमिर माझा क्रश होता, तो मला भंकर आवडत होता असं अनेक वर्षांनंतर सांगणारी ही अभिनेत्री आहे, राणी मुखर्जी. 

आगामी Bunty Aur Babli 2 या चित्रपटाच्या निमित्तानं राणी मुखर्जी आणि सैफ अली खान सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अभिनेतार रणवीर सिंग सूत्रसंचालन करत असणाऱ्या अशाच एका कार्यक्रमात ते पोहोचले, तिथेच राणीनं हा उलगडा केला. तिनं व्यक्त केलेल्या आपल्या सहकलाकाराप्रतीच्या या भावना आमिरलाही आनंद देऊन गेल्या असतील. 

'कुछ कुछ होता है', या चित्रपटाच्या निमित्ताने राणीनं आपल्याला शाहरुख खान याच्याकडूनही बरंच शिकायला मिळालं होतं, असं सांगितलं. या कलाकारांसोबत काम करायला मिळणं हा एक उत्तम अनुभव होता असंही तिनं या कार्यक्रमात सांगत आपल्याला याचा सार्थ अभिमान असल्याचं स्पष्ट केलं.