Big Boss Fame Actress Resham Tipnis Mother's Death : फक्त मराठी नाही तर हिंदी कलाक्षेत्रात आपल्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री रेशम टिपणीसवर (Resham Tipnis) दु: खाचा डोंगर कोसळला आहे. रेशमच्या आईचं निधन झालं आहे. रेशमनं तिच्या आईसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत या विषयी माहिती दिली आहे. इतकंच नाही तर आई विषयी सांगत रेशम भावूक झाली आहे. (Resham Tipnis Mother Death)
रेशमनं तिच्या आईच्या निधनाची बातमी सांगत आज एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रेशमनं आईसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत डोक्यावरून आईचं छत गेल्यानंतर कसं वाटतं हे सांगितलं आहे. रेशमची आई तिला नेहमी फोन करून तिच्याशी गप्पा मारायची, तिची विचारपूस करायची. आता त्या सगळ्या गोष्टींची रेशमला किती आठवण येईल हे तिनं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Resham Tipini Shared A Post On Her Mother's Death News)
रेशमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. हे फोटो शेअर करत रेशम म्हणाली,"आई…यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू मला खंबीर बनवलंस. मी तूला वचन देते की यापुढेही मी अशीच खंबीर राहिन. खूप प्रेम. मला तुझी खूप आठवण येईल," असे कॅप्शन रेशमनं दिलं आहे. रेशमच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला धीर देत तिला स्वत: ला सांभाळण्यास सांगितले आहे. यासोबत त्या सगळ्यांनी रेशमच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. (Resham Tipnis Instagram Post)
हेही वाचा : Divorce नंतर इतकं मद्यपान केलं की मृत्यूच्या दारात पोहोचली होती 'ही' अभिनेत्री, महेश भट्ट यांच्यामुळे वाचली
रेशम टिपणीस एका मराठी रिअॅलिटी (Resham Tipinis In Marathi Reality Show) या रिएलिटी शोमुळे चर्चेत आली होती. या शोमधील रेशमचा बोल्ड, बिनधास्त अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. रेशम सगळ्यात शेवटी ती 'भाऊबळी' चित्रपटात दिसली होती. रेशम ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. (Actress Resham Tipnis Shares a post on social and Told netizens about her Mother s Death )