Divorce नंतर इतकं मद्यपान केलं की मृत्यूच्या दारात पोहोचली होती 'ही' अभिनेत्री, महेश भट्ट यांच्यामुळे वाचली

अभिनेत्रीनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ही अभिनेत्री महेश भट्टच्या खूप जवळची आहे. 

Updated: Dec 26, 2022, 01:56 PM IST
Divorce नंतर इतकं मद्यपान केलं की मृत्यूच्या दारात पोहोचली होती 'ही' अभिनेत्री, महेश भट्ट यांच्यामुळे वाचली

Mahesh Bhatt Saved His Daughter Pooja Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजानं 90 च्या शतकात तिच्या ग्लॅमरस अंदाजानं खळबळ उडवली होती. पूजाचं लग्न झालं होतं, याची माहिती खूप कमी लोकांना आहे. मात्र, पूजाचं वैवाहिक आयुष्य हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत होतं. पूजानं पूर्वाश्रमीचा पती मनीष माखिजापासून घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या आयुष्यात खूप मोठे परिणाम झाले. इतकंच काय तर त्यानंतर पूजाला मद्यपानाचे व्यसन लागले आणि त्यानं तिच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला होता. 

अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार पूजा भट्टला मद्यपानाचे व्यसन होते. पूजानं 2003 मध्ये वीजे मनीष मखीजासोबत लग्न केलं होतं. 11 वर्षे संसार केल्यानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी लगेच घटस्फोट घेतला. पूजाला असलेले मद्यपानाचे व्यसन आणि त्यांच्यात वाढत असलेली भांडण पाहता त्यांनी 2014 साली घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या 2 वर्षांनंतर देखील पूजानं मद्यपान करण्याचं बंद केलं नाही. घटस्फोटानंतर तर पूजा चक्क इतकं मद्यपान करू लागली की पूजा चक्क मृत्यूच्या दारात होती. एका मुलाखती दरम्यान, पूजानं हा मोठा खुलासा केला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वडील महेश भट्ट यांना होती मुलीच्या व्यसनाची चिंता

डॉक्टरांच्या इशाऱ्यांनंतर पूजानं 2016 पासून दारू पिणं बंद केलं होतं. पूजानं दारू सोडली नाही तर तिचा मृत्यू होऊ शकतो, असे डॉक्टरांनी तिला सरळ शब्दात सांगितले होते. लेक पूजाला असलेले हे व्यसन पाहता वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांची चिंता वाढू लागली होती. पूजाला सतत मद्यपान करताना पाहून महेश यांनी तिला दारू सोडण्यास सांगितले. वडिलांच्या शब्दाला मान देत पूजानं लगेच दारू सोडली. पूजानं 2016 पासून मद्यपानाला हातही लावलेला नाही. 

हेही वाचा : "त्यानं तिचा वापर केला आणि...", Tunisha Sharma च्या आईनं शिझान खानवर केले गंभीर आरोप

पूजानं चक्क वयाच्या 17 व्या वर्षी डॅडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर पूजानं कमी वयातचं मद्यपान करण्यास सुरुवात केली होती. 1989 मध्ये आलेला हा चित्रपट पूजाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी बनवला होता. मात्र, पूजाला खरी लोकप्रियता ही 'ऐ दिल है की मानता नहीं' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळाली होती. या चित्रपटात आमिर खान (Aamir Khan) आणि पूजा भट्ट यांची जोडी दिसली आणि हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. पूजाच्या फिल्मी करिअरला वेग आला असतानाच ती एका वादामुळे चर्चेत आली होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x