प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, "हा क्रिकेटर माझं पहिलं प्रेम"

फिल्मी सितारे आणि क्रिकेट विश्वातील लोकांचे एकमेकांशी संबध असणे ही तशी फारशी मोठी गोष्ट नाही.

Updated: Nov 23, 2021, 02:20 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, "हा क्रिकेटर माझं पहिलं प्रेम" title=

मुंबई : फिल्मी सितारे आणि क्रिकेट विश्वातील लोकांचे एकमेकांशी संबध असणे ही तशी फारशी मोठी गोष्ट नाही. आपण या आधी देखील अशा अनेक जोड्या पाहिल्या आहेत. परंतु आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्रिनं एक खळबळजणक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने सांगितलं की, तिचं पहिलं प्रेम कोण आहे. रिचा चढढा सध्या अली फजल सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. परंतु तिने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल कबुली दिल्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.

रिचा चढ्ढाने सांगितले की, तिचं पहिलं प्रेम राहूल द्रविड आहे. ज्यामुळे सर्वत्र लोकं चर्चा करत आहेत.

भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज आणि टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड तसा फारसा सोशल मीडियावर सक्रिय दिसत नाही. तरीही त्याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. त्याच्या खेळामुळे अजूनही अनेक क्रिकेट प्रेमी त्याचे फॅन आहेत.

बॉलिवूड अभिनेत्रीकडून प्रेमाची कबुली

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने राहुल द्रविडला तिचे पहिले प्रेम असल्याची कबुली दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना रिचा चढ्ढा म्हणाली की, ती आता क्रिकेटला जास्त फॉलो करत नाही, पण कधी कधी फक्त राहुल द्रविडला पाहण्यासाठी ती मॅच बघायची.

राहुल द्रविडला पहिले प्रेम सांगितले

रिचा चढ्ढा म्हणाली की, जेव्हापासून राहुल द्रविड निवृत्त झाला तेव्हापासून त्याने क्रिकेट पाहणे बंद केले होते. रिचा म्हणाली, "लहानपणी मी क्रिकेटची फार मोठी फॅन होती. होय, माझा भाऊ क्रिकेट खेळायचा. एक काळ असा होता की मी टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघायचे. मला राहुल द्रविडला खेळताना बघायला खूप आवडायचं. जेव्हा त्याने संघ सोडला तेव्हा मी क्रिकेट फॉलो करणं बंद केलं. माझे पहिले प्रेम राहुल द्रविड आहे."

राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे

राहुल द्रविड हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक आहे. राहुल द्रविडने भारतासाठी 164 कसोटी सामन्यांमध्ये 13 हजार 288 धावा आणि 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 हजार 889 धावा केल्या आहेत. अलीकडेच रवी शास्त्रीच्या जागी राहुल द्रविडला टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.