लग्नाऐवजी मराठमोळ्या अभिनेत्रीनं निवडला सर्वोत्तम पर्याय; पाहून तुम्हीही द्याल शाबासकी

लग्न कधी करणार...? या प्रश्नांना तिनं ज्या अंदाजात उत्तर दिलंय हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.   

Updated: Sep 13, 2022, 09:41 AM IST
लग्नाऐवजी मराठमोळ्या अभिनेत्रीनं निवडला सर्वोत्तम पर्याय; पाहून तुम्हीही द्याल शाबासकी  title=
Actress rutuja bagwe buys new dream home shares first photo

मुंबई : वयाच्या अमुक एका टप्प्यावर आल्यावर मला तमुक गोष्ट करायचीये, अशी आखणी अनेकांनीच केलेली असते. त्यासाठी अपेक्षित शिक्षण, पुढे नोकरी आणि पैशांची जमवाजमव करत एक एक स्वप्न साकारण्याकडे या मंडळींचा कल असतो. यामध्ये मुलींना एका परिस्थितीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. ती परिस्थिती म्हणजे, वय वाढतंय.... लग्न कधी करणार? (Marriage) कौटुंबीक समारंभ असो, किंवा मग एखादा इतर कोणता कार्यक्रम, लग्नाच्या वयात आलेली मुलगी दिसली, की कथित जबाबदार मावशी, काकू सगळ्याजणी येऊन एकच प्रश्न गिरवताना दिसतात. 

असेच प्रश्न एका मराठमोळ्या अभिनेत्रीला आणि तिच्यामुळं तिच्या आईलाही विचारण्यात आले. पण, लग्नापेक्षाही आयुष्यात काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्यांची पूर्तता करण्याला या अभिनेत्रीनं प्राधान्य दिलं. (Perfect age to get married)

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही सर्वात आनंदाची माहिती समोर आणली. लग्नाऐवजी दुसराच पर्याय निवडत एका नव्या पर्वात प्रवेश करणारी ही अभिनेत्री आहे, ऋतुजा बागवे. स्वत:चं हक्काचं घर खरेदी करत (dream home), आई- वडिलांचं स्वप्न साकारत ऋतुजानं एका नव्या पायरीवर पाऊल ठेवलं. (Actress rutuja bagwe buys new home shares first photo)

वाचा : करण जोहरला करायचं होतं 'या' अभिनेत्रीशी लग्न; आज आहे दिग्गज अभिनेत्याची पत्नी!

आईकडून मिळालेली शिकवण, तिनं दाखवलेलं स्वप्न आणि ते पाहण्यासाठी वडिलांनी दिलेला पाठिंबा या साऱ्याप्रती तिनं कृतज्ञता व्यक्त केली. 'जेव्हा लोक विचारतायत की वय झालंय लग्न कधी करणार तेव्हा माझी आई म्हणाली वय झालं म्हणून नाही तुला जेव्हा करावास वाटेल तेव्हा लग्न कर पण त्याआधी independent हो स्वतःचं घर घे... आई thank you sooooo much हे स्वप्न तू दाखवलस', असं तिनं एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं. 

बाबा तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं, आईने स्वप्न दाखवलं; पण तुम्ही पाठीशी होतात म्हणून घेतली उडी असं म्हणत वडिलांचेही तिनं आभार मानले. हक्काच्या घरात पाऊल ठेवल्यानंतरचे पहिलेवहिले क्षण ऋतुजानं चाहत्यांच्या भेटीला आणले. तिची ही पोस्ट पाहून सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला.