मुंबई : सिद्धार्थ शुक्ला पंचतत्वात विलीन झाला आहे. त्याला शेवटचा निरोप देताना, चाहत्यांसह, स्टार्सने देखील भावूक झाले होते. सिद्धार्थसोबत काम केलेले प्रत्येक कलाकार सिद्धार्थला शेवटच्या वेळी पाहण्यासाठी उपस्थित होते. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात भावना सेठ काही पोलिसांसोबत वाद घालताना दिसली. तिने आरोप केला आहे की पोलिसांनी तिचा पती अविनाशला कानशिलात लगावली. भावना सेठचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश जेव्हा आले तेव्हा त्यांना पोलिसांनी गेटमधून आत सोडताना बाचाबाची झाली. पण पोलिसांनी मारलं नसल्याचं म्हटलं आहे.
बिग बॉस 2 मध्ये गाजलेली अभिनेत्री संभावना सेठ सध्या प्रसिद्ध यूट्यूबर बनली आहे. संभावनाच्या व्हिडिओ ला खूप लोकं पाहतात. तिचे 10 लाखाहून अधिक सब्स्क्राइबर्स देखील आहेत. तिन भोजपुरी सिनेमासह बॉलिवुडच्या काही गाण्यांमध्ये ही काम केलं आहे.