सिद्धार्थ शुक्लाला आजही त्याच नावानं हाक मारते शहनाज; घडलं असं काही की पाणावतील तुमचेही डोळे

अनेकांनीच तिच्याबाबत चिंतेचा सूर आळवला.   

Updated: Oct 19, 2021, 07:31 AM IST
सिद्धार्थ शुक्लाला आजही त्याच नावानं हाक मारते शहनाज; घडलं असं काही की पाणावतील तुमचेही डोळे  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल मागच्या काही काळापासून तिच्या खासगी जीवनात आलेल्या वादळातून सावरताना दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा शहनाजचा अतिशय जवळचा मित्र आणि तिचा तथाकथित प्रियकरगही होता. पण, त्याच्या अचानकच जाण्यानं शहनाजला मोठा हादरा बसला. बऱ्याच दिवसांनंतर शहनाज तिच्या चित्रपटाच्या निमित्तानं माध्यमांसमोर आली आणि अनेकांनीच तिच्याबाबत चिंतेचा सूर आळवला. 

सिद्धार्थला शहनाज क्षणोक्षणी आठवत असते, हे तिच्या वागणाबोलण्यातून पुन्हा एकदा सर्वांसमोर आलं आहे. 'हौसला रख' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अभिनेता दिलजीत दोसांज, अभिनेत्री सोनम बाजवा आणि शहनाज त्यांच्या आगामी प्रोजेक्टबाबतही बोलताना दिसले. त्यांचं हे बोलणं ओघाओघानं 'बिग बॉस 13' च्या दिशेनं गेलं. 

एकमेकांविषयीसुद्धा हे कलाकारा भरभरुन बोलले. सोमन ही काहीशी मितभाषी असून ती लोकांमध्ये रुळण्यासाठी वेळ घेते असं शहनाज म्हणाली. त्यावर सहमत होत, फार कमी लोक अगदी सहजपणे सर्वांमध्ये मिसळतात शहनाज त्यापैकीच एक आहे असं म्हणाली. दिलजीतही तेव्हात काही म्हणाला, ज्याचं उत्तर देत, मी बिग बॉस 13 ची हिरॉईन होते, असं चेहऱ्यावर स्मित आणत शहनाज म्हणाली. 

तेव्हा सोनम बाजवानं शहनाजला उल्लेख 'हिरो' असा केला. ज्यावर 'मी बिग बॉसची हिरॉईन होते, हिरो कोणी दुसराच होता' असं ती सिद्धार्थचं नाव न घेता त्याच रोखानं म्हणाली. सिद्धार्थप्रती असणारी शहनाजची ओढ आजही कायम असून, तिला या साऱ्यातून पुढे जाण्याचं बळ मिळावं अशीच कामना सध्या चाहते करताना दिसत आहेत.