या फोटोतली क्यूट मुलगी आता करतेय बॉलिवूडवर राज्य, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री

बॉलिवूड स्टार्समध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. 

Updated: Oct 18, 2021, 10:44 PM IST
या फोटोतली क्यूट मुलगी आता करतेय बॉलिवूडवर राज्य, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री

मुंबई : बॉलिवूड स्टार्समध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. बॉलिवूड सेलेब्स सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. एकापाठोपाठ एक सगळे सेलेब्स आता त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करताना दिसत आहेत. या ट्रेंडमध्ये करीना कपूरपासून मिलिंद सोमणपर्यंत अनेक मोठ्या कलाकारांचे फोटो पाहायला मिळाले. आता या ट्रेंडमध्ये आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे. होय, या ट्रेंडमध्ये पुढे जात अभिनेत्री सोनम कपूरनेही तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप गोंडस दिसत आहे.

सोनम कपूरने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सोनम खूपच गोंडस आणि सुंदर दिसत असल्याचं या फोटोत पाहिलं जाऊ शकतं. सोनमचा हा फोटो पाहून चाहते तिचं जोरदार कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने 'baby you was cute but young you is so hot' असं लिहिलं आहे, मग कोणीतरी 'बेस्ट इवा, अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर तिच्या या फोटोवर 115 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनम कपूरने आपल्या करिअरची सुरुवात 'सावरिया' चित्रपटातून केली होती. ती शेवटची 'द झोया फॅक्टर' चित्रपटात दिसली. तिने 'आय हेट लव्ह स्टोरी', 'रांझना', दिल्ली -6, नीरजा यासारख्या हिट चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सोनम कपूरला 'रंझना' चित्रपटासाठी फिल्मफेअर आणि झी सिने पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे