पाहा, सिद्धार्थच्या निधनानंतर पहिल्यांदाच शहनाजची भावनिक पोस्ट

तू मेरा है और..., 

Updated: Oct 28, 2021, 03:17 PM IST
पाहा, सिद्धार्थच्या निधनानंतर पहिल्यांदाच शहनाजची भावनिक पोस्ट
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ‘बिग बॉस 13’ (Bigg Boss 13) फेम शहनाज गिल आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची मैत्री आणि या मैत्रीपलीकडेही असणारं नातं अनेकदा प्रकाशझोतात आलं. सिद्धार्थच्या निधनानंतर या नात्याचा डोलारा कोलमडला. शहनाज एकटी पडली आणि प्रत्येकालाच तिची चिंता वाटू लागली. आपल्या आयुष्यात सिद्धार्थच्या जाण्यानं इतकी मोठी पोकळी निर्माण झालेली असतानाही शहनाज आता स्वत:ला सावरु लागली आहे. 

सिद्धार्थला मात्र ती विसरु शकलेली नाही. शहनाजच्या निधनानंतर शहनाजनं आताच पहिली सोशल मीडिया पोस्ट केली आहे. 

ही पोस्ट करत तिनं भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 

शहनाजसाठी सिद्धार्थ किती महत्त्वाचा आहे हेच तिची ही पोस्ट वाचताना लक्षात येत आहे. जिथं तिनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो पोस्ट करत 'तू मेरा है, और.... ' असं कॅप्शन दिलं आहे. 

'तू यहीं है...' अशा शीर्षकाचा एक म्युझिक व्हिडीओ शहनाज खास सिद्धार्थसाठी सर्वांच्या भेटीला आणत आहे. 

एका खास व्यक्तीसाठी खास अंदाजात काहीतरी करण्यासाठी शहनाजनं हे पाऊल उचललं आहे. या निमित्तानं त्याचं आपल्या जवळ नसणं, ही तिच्या मनातील खंत लगेचच समोर येत आहे. 

किंबहुना सिद्धार्थच्या विचारानंच शहनाजची काय अवस्था होत असेल, हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे.