'फिर आई हसीन दिलरुबा'चा ट्रेलर रिलीज, तापसी पन्नूचा जबरदस्त रोमान्स

येत्या काळात अनेक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. यापैकी एक म्हणजे 'फिर आयी हसीन दिलरुबा' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या या ट्रेलरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 25, 2024, 05:06 PM IST
'फिर आई हसीन दिलरुबा'चा ट्रेलर रिलीज, तापसी पन्नूचा जबरदस्त रोमान्स

Phir Aayi Hasseen Dillruba: तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर रोमँटिक चित्रपट 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर आज (25 जुलै) रिलीज झाला आहे. प्रेम, विश्वासघात आणि खुनाच्या रहस्याने हा चित्रपट भरलेला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा एका खून प्रकरणात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट 9 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 2021 मध्ये आलेल्या 'हसीना दिलरुबा' चित्रपटाचा सिक्वेल आहे. यावेळी विक्की कौशलचा भाऊ सनी कौशल या चित्रपटात सहभागी झाला आहे.

ट्रेलरमध्ये काय? 

'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये तापसी 'राणी'च्या पात्रात दिसत आहे.  चित्रपटात तिची व्यावसायिकता अतिशय प्रभावीपणे दाखवली आहे. राणीचा नवरा 'ऋषू' म्हणजेच विक्रांत मॅसीची व्यक्तिरेखाही खूपच सुंदर आहे. ट्रेलरमध्ये त्याच्या आणि राणीच्या लग्नाची दृश्येही दाखवण्यात आली आहेत. ऋषू आपल्या पत्नीला सांगतो की, त्याच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होऊ नये. मात्र, ट्रेलरमध्ये पुढच्याच सीनमध्ये 'अभिमन्यू' म्हणजेच सनी कौशल राणीच्या आयुष्यात येतो. जो राणीच्या आयुष्यात पूर्णपणे बुडून जातो. 

या दिवशी होणार रिलीज 

'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट नीलच्या गूढ हत्येवर आधारित आहे. नीलचा खून कोणी केला हे शेवटी कळेल. राणीने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी हे कृत्य केलं का? की राणीच्या भोवतालच्या लोकांपैकी तिचा नवरा ऋषू सक्सेना याने हे केलं आहे. हे सर्व रहस्य 9 ऑगस्ट रोजी उघड होणार आहेत. 

तापसीचा आगामी चित्रपट

तापसी पन्नू लवकरच अक्षय कुमारसोबत 'खेल खेल में' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तिचा प्रतिक गांधीसोबतचा 'वो लडकी है कहाँ' चित्रपट देखील सध्या चर्चेत आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More