मुंबईः उर्फी जावेदला कोणत्याही परिचयाची गरज नाही. नेहमीच अतरंगी स्टाईलने उर्फी चर्चेत असते. प्रत्येक वेळी मात्र हे ड्रेस कोण डिझाईन करतं असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतो.
उर्फी तिच्या बोल्ड आणि विचित्र कपड्यांमुळे प्रसिद्ध झाली. तिच्या लोकप्रियतेमध्ये तिच्या ड्रेस डिझायनरचा मोठा हात आहे. कधी अंगावर फुलं लावणं तर कधी सेफ्टी पिनचा ड्रेस, फ्रंट ओपन ड्रेस चर्चेत राहिला.
श्वेता श्रीवास्तव असं उर्फीच्या ड्रेस डिझायनरचं नाव असून उर्फीच्या ड्रेसला वेगळाच टच देण्याचं काम श्वेता करते. दिसायला विचित्र दिसत असतील तरी असे ड्रेस डिझाईन करण्यासाठी श्वेता प्रचंड मेहनत घेते.
एका मुलाखतीत श्वेताने सांगितले की, उर्फी पुढच्या महिन्यात काय परिधान करणार हे ती एक महिना आधीच ठरवते. म्हणजेच उर्फीचे कपडे महिनाभर आधीच डिझाइन केलेले असतात. श्वेता नेहमीच वेगळं काहीतरी डिझाईन करून उर्फीला इतरांपेक्षा वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असते.
श्वेता फॅशन आणि बोल्डनेसच्या बाबतीत उर्फीपेक्षा काही कमी नाही. इन्स्टाग्रामवर श्वेताचे फोटो पाहिल्यास एकापेक्षा एक बोल्ड फोटो पाहायला मिळतील.
श्वेताने तिच्या इंस्टाग्रामवर उर्फीसाठी डिझाइन केलेल्या कपड्यांचे फोटोही शेअर केले आहेत.