मुंबई : अभिनेत्री (Zeenat Aman) या 70 च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. झीनत अमान यांनी ऑनस्क्रीन बिकिनी परिधान करून हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली होती. झीनत यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. झीनत यांनी संजय खानसोबतचे पहिले लग्न केलं होतं. झीनत यांच्या लग्नाला सुमारे 1 वर्ष उलटल्या नंतर त्यांच्या आणि संजय खान यांच्यात संबंध ठीक नव्हते. त्यानंतर त्यांचे लग्न मोडले आणि त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या.
हेही वाचा : Shraddha Murder Case: 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीची प्रेमात फसवणूक, लिव्ह इनमध्ये अशी परिस्थिती
झीनत यांनी त्यानंतर मजहर खानसोबत लग्नगाठ बांधली होती. परंतू 1998 मध्ये त्यांचे पति मजहर खान यांचे देखील निधन झाले होते. झीनत या त्यांच्या पतीच्या अंत्यसंस्काराला सुद्धा गेल्या नव्हत्या. झीनत अमान यांनी सिमी ग्रेवालच्या शोमध्ये सांगितले की 'जेव्हा त्यांच्या पतीचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पतीच्या कुटुंबीयांनी मजहरला तिला भेटू दिले नाही. यामुळे झीनत या अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी जाऊ शकल्या नाही.
मुलाखतीत झीनत अमान यांनी खुलासा केला की, त्यांनी आई होण्यासाठी दुसरं लग्न केलं होतं. त्यांना लवकरच बाळाची योजना करायची होती. त्यामुळेच त्यांनी मजहर यांच्याशी दुसरे लग्न केले होते. पण मजहरच्या मृत्यूपूर्वीच झीनत आणि मजहर वेगळे झाले होते. (actress zeenat aman was not allowed to attend husband mazhar funeral)
झीनत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या पतीला प्रिस्क्रिप्शन ड्रग्सचे व्यसन होते. त्यामुळे मजहर यांची तब्येत बिघडली होती. झीनत यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यानंतरही मजहर यांचे व्यसन सुटले नाही, त्यामुळे मजहर यांचा मृत्यू झाला. किडनीच्या समस्येमुळे मजहरचा मृत्यू झाला होता. किडनीच्या समस्येमुळे झीनत यांचे निधन झाले होते.