रॅपर बादशाहाच्या गाण्यावरील अदाचा नवा डान्स व्हिडिओ व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने इंस्‍टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Updated: Apr 13, 2018, 03:00 PM IST
रॅपर बादशाहाच्या गाण्यावरील अदाचा नवा डान्स व्हिडिओ व्हायरल... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने इंस्‍टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती रॅपर बादशाहच्या गाण्यावर जबरदस्‍त डान्स करताना दिसतेय. '1920'    आणि कमांडो २ यांसारख्या सिनेमात झळकलेली अभिनेत्री अदा खान सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. 

तिचा नवा व्हिडिओ...

काही दिवसांपूर्वी आपल्या आजीसोबत मस्तीभऱ्या अंदाजात डान्स करतानाचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. यात तिने बादशाहचे गाणे करेजा, करेजा... यावर थिरकत आहे. तिचे डान्स मुव्ह्ज खूप सुंदर आहेत. पहा तिचा हा नवा व्हिडिओ...

अदाचे सिनेमे

अदा शर्माने २००८ मध्ये '1920'  या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राचा सिनेमा हंसी तो फंसी मध्येही अदा सिद्धार्थसोबत रोमान्स करताना दिसली होती. तर गेल्या वर्षी अदा विद्युत जमवालसोबत कमांडो २ मध्ये झळकली होती. यात ती हैद्राबादी भाषा बोलत होती.