अनेकदा आपण ऐकलं असेल की जबरा फॅन्समुळे कलाकारांना भरपूर त्रास सहन करावा लागतो.
मुंबई : फॅन्सच्या नकोत्या मागणीमुळे सेलिब्रिटी हैराण झाल्याचे आपण पाहिले आहे. असाच एक प्रकार अभिनेत्री अदा शर्मासोबत घडला आहे.
अदा नुकतीच एका मीडिया इव्हेंटला गेली होती. तेव्हा चक्क एका फॅनने अदा शर्माकडे नको ती मागणी केली. त्या फॅनने अदा शर्माला आपल्या गालावर किस करण्याची मागणी केली. अदाने लगेच त्या चाहत्याला नकार दिला. यानंतर त्या चाहत्याने काहींच्या मदतीने अदा शर्माला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरूवात केली. तिला टार्गेट करत अनेक उलट सुलट चर्चा देखील रंगल्या. तसेच कमांडो २ या सिनेमात अदा शर्माने भरपूर मोठा किस केल्याची चर्चा आहे तर मग एका फॅनला किस करण्यासाठी अदा का नकार देते? असा देखील सवाल विचारला जात आहे.
I have never had a twitter outburst in the 3 yrs that I've been on twitter but accusations of "being insulted" for not being given a "HARMLESS KISS" have provoked me. I speak for a lot of girls here when I say the following ...
— Adah Sharma (@adah_sharma) December 5, 2017
A kiss for me isn't harmless!You say "what's the big deal" well who are u to decide what deal is big and small for me?Deals aside,I want to choose who I exchange saliva with or whose cheeks/other parts I plant my lips on! Or who I want to make eye contact with too.(Male/female)
— Adah Sharma (@adah_sharma) December 5, 2017
If a boy meets me for the first time and asks me for a KISS on whichever part of his anatomy, REPEATEDLY he would at most times get punched,slapped or kicked in his groin. If your penis is intact consider yourself lucky because my kicks are precise and lethal.
— Adah Sharma (@adah_sharma) December 5, 2017
I might expose my knees and elbows and OMG! I showed off my spine and my shoulders too! But that doesn't mean I'm expected to have any physical contact with any human under complultion.(Physical contact could even be handshakes btw.)
— Adah Sharma (@adah_sharma) December 5, 2017
Bhavana Reddy kissed in a public place in Commando2, Hayaati had a 1 hr 45 minute kiss in Heartattack but I'm Adah Sharma am NOT THEM!!!i'm happy my performances convince you that I am these people but the real me reacts,dresses,breathes,lives differently
— Adah Sharma (@adah_sharma) December 5, 2017
या चाहत्याच्या वक्तव्यावर अदा शर्मा भडकली असून तिने ट्विटरवर एकापाठोपाठ अनेक ट्विट केले आणि ट्रोलरला प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली की, गेल्या तीन वर्षात मी कधीच ट्विटरवर आपला असा राग व्यक्त केलेला नाही मात्र मला त्रास देण्यात आलेला आहे. मी किस देण्यास नकार दिल्यामुळे मला सगळ्यांसमोर टार्गेट केलं जातं.
तिने म्हटलंय की, माझ्यासाठी किस काही हार्मलेस नाही. तू म्हणतोस की किस करण्यात काय प्रश्न आहे. पण तू कोण होतोस हे सांगणारा की, माझ्यासाठी कोणती गोष्ट लहान आहे आणि कोणती गोष्ट मोठी आहे. हा माझा निर्णय आहे की मी कुणाला किस करायचं आणि कुणाला नाही.