Adipurush Box Office Record: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील सीन्स, डायलॉग्स आणि व्हिएफेक्सवर अनेकांनी आक्षेप घेतला. देशभरात या चित्रपटावरून वाद सुरु असताना दुसरीकडे या चित्रपटानं परदेशात नवीन रेकॉर्ड मोडला आहे. प्रभासचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रिपोर्ट्सनुसार,आदिपुरुषनं अमेरिकेत बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या 8 व्या दिवशी खूप मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
अमेरिकेतील बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष' हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. तर तिथल्या बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई करणारा प्रभासचा हा चौथा चित्रपट आहे. 'आदिपुरुष' नं आठव्या दिवशी अमेरिकेतील बॉक्स ऑफिसवर 3 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. या आधी बाहुबली 1, बाहुबली 2, साहो आणि आदिपुरुष असे हे चार चित्रपट आहेत. तर प्रभासचे हे चारही चित्रपट 3 मिलियन डॉलर क्लबमध्ये आहेत. प्रभासनं 3 मिलियन डॉलर क्लबमध्ये एन्ट्री करताच एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
#Adipurush ZOOMS past $3M [₹24.58 cr] at the USA Box Office. #Prabhas holds the record for most number of movies in the $3M club from South India.
Movies which has crossed $3M so far at the usa box office for Prabhas till date.
1 #Baahubali2 - $20,571,695
2 #Baahubali -… pic.twitter.com/C8ItRy5teY— Manobala Vijayabalan (@ManobalaV) June 24, 2023
आदिपुरुषच्या भारतातील कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर 9 व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत कमी झाली आहे. चित्रपटात दिवसेंदिवस कमाईत घट होत आहे. नव्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 5.25 कोटींचं कलेक्शन केलं आहे. त्यासोबत त्याची एकूण कमाई ही 268.55 कोटी आहे. तर जगभरात चित्रपटानं आतापर्यंत कमाईत 400 कोटींचा आकडा पार केला आहे. तर चित्रपटाचं बजेट हे 600 कोटींपेक्षा जास्त होतं. हे पाहता चित्रपटानं 9 दिवसात केलेली कमाई ही खूप कमी आहे.
हेही वाचा : चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे निधन, रेखा यांना दिला होता सिनेमात ब्रेक
दरम्यान, चित्रपटातील डायलॉगमुळे होणारा वाद पाहता, त्यात काही बदल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात हनुमानचे डायलॉग्स आहेत. हे डायलॉग्स चित्रपट एडिट करण्यात आल्या नंतरचे आहेत. सुरुवातीला व्हायरल झालेल्या डायलॉगमध्ये 'कपडा तेरे बाप का...तो जलेगी भी तेरे बाप की' असं हनुमान बोलत असल्याचे दिसत होतं. आता त्याजागी 'कपडा तेरी लंका का ...तो जलेगी भी तेरी लंका' असा करण्यात आला आहे. दुसरीकडे आदिपुरुषवर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. तर 22 आणि 23 जूनसाठी या चित्रपटासाठी टीसीरिजनं 3D चित्रपटाचे तिकिट 150 रुपयात मिळत होते. तरी देखील आदिपुरुष या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही.