Why Ravan Doesn't Touches Sita: हे वर्ष खऱ्या अर्थानं बॉलिवूडच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याला कारण ठरेल आहेत ते म्हणजे हे काही वादग्रस्त चित्रपट! या वर्षाच्या सुरूवातीलाच वाद रंगला तो म्हणजे 'पठाण' या चित्रपटामुळे. या चित्रपटातून दीपिका पादुकोणनं घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर कुठेतरी हा वाद लोकं विसरतायत तोच दुसऱ्या वादालाही फोडणी मिळाली आणि वाद रंगला तो म्हणजे 'आदिपुरूष' या चित्रपटावरून. राम, सीता आणि हनुमान तसेच रावण यांचे चुकीच्या पद्धतीनं प्रदर्शन केल्यामुळे नेटकरी नाराज झाले होते. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत त्यामुळे सर्वत्र याच चित्रपटाची चर्च रंगली.
सध्या या चित्रपटाविषयी सोशल मीडियावरून अनेक लोकं टीका आणि टिप्पणी करताना दिसत आहेत. त्यातून आता या चित्रपटाच्या लेखकानं एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामुळे सध्या त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 'आदिपुरूष' हा चित्रपट अवघ्या दोन दिवसांनी चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींगही जोरदार सुरू आहे. तेव्हा या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे फारच चांगले राहणार आहे, अशी अपेक्षा केली जाते आहे.
हेही वाचा - पोटापाण्यासाठी एकेकाळी वॉचमन असणारा 'हा' अभिनेता सलमान, शाहरूखला देतोय टक्कर!
या चित्रपटातून अभिनेत्री क्रिती सनन ही सीतेच्या भुमिकेतून दिसणार आहे. तर अभिनेता प्रभास हा प्रभु श्री रामाच्या भुमिकेतून दिसणार आहे. हनुमानाची भुमिका देवदत्त नागे यांनी केली असून रावणाची भुमिका ही सैफ अली खान यानं केली आहे. त्यामुळे या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यात एक दृश्य दाखवण्यात आले आहेत. ज्यात रावण सीतेचे अपहरण करताना दिसतो परंतु तो सीतेला स्पर्शही करत नाही. त्याऊलट सीतेच्याभोवती एक जाळं पसरतं आणि मग ते जाळंच तिला पुढे घेऊन जातं.
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 13, 2023
याविषयी बोलताना चित्रपटाचे लेखक मनोज मुंतसीर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणाले की, ''सीतेच्या आधी रावणानं आपली सून रंभा हिला आपल्या वासनेचा बळी केले. त्यामुळे रंभाने रावणाला शाप दिला की जर त्यानं कोणत्याही स्त्रीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श केला तर त्याच्या डोक्याचे तुकडे तुकडे होतील. म्हणूनच रावणानं सीतचे अपहरण केले तेव्हा तिला स्पर्श केला नाही. रावणानं सीतेला धर्मामुळे नाही तर मृत्यूच्या भीतीनं स्पर्श केला नव्हता'', असा खुलासा त्यांनी केला आहे.