Ananya Pande and Aaditya Roy Kapoor: बॅालिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॅाय कपूरचं प्रेमप्रकरण बॅालिवूडमध्ये चांगलंच गाजलं. 'कॉफी विथ करण' या शोमधून दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. परंतु आता अनन्या पांडेने शेअर केलेल्या एका व्हिडीओत दोघे एकत्र दिसल्यामुळे पुन्हा त्यांच्यात पॅचअप झालं की काय असं वाटून चाहते संभ्रमात पडले आहेत. नक्की हा काय प्रकार आहे जाणून घेऊया.
अनन्या पांडेने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आदित्य रॅाय कपूर तिच्यासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. दोघांनी डॅशिंग अंदाज देणारे कपडे परिधान केले असून स्टायलिश चष्मा लावला आहे. दोघेही एकमेकांकडे पाहून खळखळून हसत आहेत. हे पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. मात्र या व्हिडीओचा त्यांच्या खऱ्या आयुष्याशी कोणताही संबंध नसून हा त्यांनी एकत्र काम केलेल्या एका जाहिरातीचा व्हिडीओ आहे. ब्रेकअपपूर्वी ही जाहिरात त्यांनी शूट केली होती. आपल्या कामाप्रती असलेल्या कमिटमेंट्सना पाळत दोघांनीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही एका चष्म्याची जाहिरात आहे.
ब्रेकअपनंतर अनन्यानेसुद्धा इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिने लिहिलं होतं की, 'जे खरोखर तुमच्यासाठी बनले असतील ते तुमच्याकडे परत येतील, ते फक्त तुम्हाला धडे शिकवण्यासाठी सोडून जातात. यातून तुम्ही शिकू शकता. जर ते खरोखर तुमच्यासाठी असतील तर तुम्ही त्यांना ढकललं तरीदेखील ते परत येतील.' या पोस्टने त्यांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झाला.
साधारण 2022 पासून बॅालिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॅाय कपूर यांच्यातील रिलेशनशीपच्या बातम्या समोर येऊ लागल्या. क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीमध्ये दोघ एकत्र दिसले होते. त्याचप्रमाणे अनेकदा त्यांनी एकत्र सुट्ट्यांचा आनंददेखील घेतला.
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.