Drugs case : आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांकडून मोठ वक्तव्य; म्हणाला, "NCB मुलांसोबत..."

ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार एका मुलाखतीत अस्लम मर्चंट म्हणाला...

Updated: Oct 5, 2021, 04:59 PM IST
Drugs case : आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांकडून मोठ वक्तव्य; म्हणाला, "NCB मुलांसोबत..." title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तसेच त्याचा मित्र अरबाज मर्चंट या दोघांसह त्यांच्या आणखी साथीदारांना देखील ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अरबाज हा सुप्रसिद्ध वकील अस्लम मर्चंटचा मुलगा आहे. अस्लम मर्चंटने आपल्या मुलावर ड्रग्ज घेतल्या आणि विकल्याच्या आरोपांवर आपले मौन तोडले आहे. अस्लम मर्चंट आणि या केससंदर्भात आपलं वक्तव्य केलं आहे. प्रत्येक वडिलांप्रमाणे त्याचे ही असेच म्हणणे आहे की, त्याच्या मुलावर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत आणि त्यांनी अरबाज आणि आर्यनला ड्रग्ज प्रकरणात निर्दोष सांगितले आहे.

ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार एका मुलाखतीत अस्लम मर्चंट म्हणाला की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुलांसोबत चांगले वागत आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि इतर अनेकांना एनसीबीने गोव्याच्या क्रूझवर केलेल्या छाप्यादरम्यान ताब्यात घेतले. सोमवारी एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मुनमुन धामेचा यांना न्यायालयात नेले आणि 11 ऑक्टोबरपर्यंत त्यांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने त्याच्या कोठडीत केवळ 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

अस्लम मर्चंट म्हणाले की, या मुलावर लावलेले सर्व आरोप निराधार आहेत, परंतु त्यांची चौकशी केली जात आहे. या क्षणी काहीही बोलणे योग्य नाही. एनसीबी खूप सहकार्य करत आहे आणि मुलांशी खूप चांगले वागत आहे. वकील म्हणून माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सत्याचा विजय होईल आणि ते निर्दोष सुटतील

अरबाजकडून ड्रग्ज मिळवण्याच्या आरोपाबद्दल जेव्हा अस्लमला विचारण्यात आले तेव्हा यावर तो म्हणाला की, 'जे काही मिळाले ते जहाजाच्या आतून मिळाले, बाहेरून नाही. ते जहाजातही शिरले नाहीत. ते फक्त पाहुणे म्हणून गेले होते.'

सोमवारी शहर न्यायालयात आर्यन आणि अरबाजला आणण्यापूर्वी देण्यात आलेल्या अहवालांनुसार, एनसीबीने दावा केला होता की, आर्यन आणि इतर दोघांच्या फोनवर व्हॉट्सअॅप चॅट्समुळे एक धक्कादायक ड्रग लिंक उघड झाली आहे.

यावर बोलताना अस्लम म्हणाला की, "ड्रग्जशी संबंधित पूर्णपणे व्हॉट्सऍप चॅट नाही. तो त्या पार्टीला जायलाही तयार नव्हता. जहाजावर चढण्याची ही शेवटच्या मिनिटाची चर्चा होती. त्याला आमंत्रित केले होते. त्याने फक्त घाईघाईने निघण्याचा निर्णय घेतला. त्याने (अरबाज) माझ्याबरोबर नाश्ता केला होता आणि तो माझ्याबरोबर रात्रीचे जेवण करणार होता."