Elvish Yadav Bedroom Video With Lovekesh Kataria : युट्यूबर एल्विश यादव आणि लवकेश कटारियामध्ये किती चांगली मैत्री आहे याविषयी आपल्या सगळ्यांना माहित आहे. ते दोघं बिग बॉसच्या वेगवेगळ्या सीझनमध्ये दिसत असले तरी ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. एल्विश यादव हा 'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता ठरला होता तर लवकेश कटारिया हा 'बिग बॉस ओटीटी 3' दिसला मात्र, तो विजेता ठरला नाही. पण लोकांच्या मनावर राज्य नक्कीच केलं. 'बिग बॉस ओटीटी 3' संपल्यानंतर त्या दोघांचा आता एक प्रायव्हेट व्हिडीओ समोर आला आहे.
एल्विश यादव आणि लवकेश कटारिया यांच्यात असलेल्या मैत्रीचे किस्से आपल्या सगळ्यांना 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये ऐकायला मिळाले. युट्यूबर अरमान मलिकनं एकीकडे लवकेशला एल्विशचा चमचा म्हटलं तर दुसरीकडे लवकेशनं त्याला बंधू-भाव म्हटलं. एल्विश यादवनं आता त्याच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एल्विश बोलताना दिसतो की ‘समलैंगिक (गे) असणं ही वाईट गोष्ट नाही.’
We already know that https://t.co/FJHdpfR7Xq pic.twitter.com/qRq7HmV1oW
— (@Unik_insaan2) August 6, 2024
सोशल मीडियावर एल्विश हा सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आता त्यानं जी पोस्ट शेअर केली आहे त्यानं त्याचे चाहत्यांना आश्चर्य झाले आहे. त्यानं या व्हिडीओसोबत असं काही शेअर केलं आहे ज्यामुळे चाहते विचारत आहेत की बंधू-भाव कसा आहे? खरंतर त्यानं जो व्हिडीओ शेअर केला आहे तो बेडरूमचा आहे आणि त्याच्यासोबत 'बिग बॉस ओटीटी 3' स्पर्धक देखील आहे. दोघेही विना शर्ट दिसत आहेत आणि एकाच बेडवर ते झोपले आहेत.
व्हिडीओच्या सुरुवातील एल्विश बोलतो की 'आम्ही विचार करत आहोत की आम्ही एक गॅंग बनवूया. त्यानंतर हसत आणि लवकेशकडे कॅमेरा फिरवतो. बेडच्या दुसऱ्या बाजुला लवकेश झोपलेला असतो. लवकेश तिथे फोन वापरत असतो. एल्विश परत हसतो आणि म्हणतो की 'हा देखी गेला झाला. गे असणं वाईट गोष्ट नाही. कधी-कधी लोकं म्हणतात की आम्ही अॅन्टी आहोत, आम्ही ओपन अप होत आहोत.'
पुढे एल्विश व्हिडीओत लवकेशला विना ट्राउजर्स कॅप्चर करतो. कॅमेरा पाहताच लवकेश पळतो. त्यानंतर ट्राउजर्स घालून लवकेश बाहेर येतो आणि बोलतो की तुमच्यावर विश्वास नाही यार मला तू व्हिडीओ बनवतोय. मग एल्विश म्हणाला, 'लोकांना कळलं की तू अंतर्वस्त्र देखील परिधान केले नाही. लवकेश म्हणाला की अंतर्वस्त्र हे बघ. हा व्हिडीओ शेअर करत एल्विशनं लिहिलं की मी LGBTQ चे समर्थन करतोय.'
हेही वाचा : 'मी सवत असले तरी तिची मोठी फॅन, पण ती कधी भेटलीच नाही!' करिना कपूरची खंत
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एल्विश आणि लवकेशचा पाठिंबा देणाऱ्यांनी या व्हिडीओला मस्करीत केलेला व्हिडीओ म्हटलं आहे. तर त्यांचे जे हेटर्स आहेत त्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत हा कोणता बंधू-भाव असं म्हटलं आहे. अनेक लोक तर म्हणत आहेत की 'ते दोघं गे आहेत यावर आता माझा विश्वास झाला.'