Salman Khan सोबतचं नातं संपवणं या अभिनेत्रींना पडलं भारी, आता कतरिना सुद्धा पडणार का बळी?

कतरिना कैफही लग्नानंतर इंडस्ट्री सोडेल का?

Updated: Dec 7, 2021, 07:03 PM IST
Salman Khan सोबतचं नातं संपवणं या अभिनेत्रींना पडलं भारी, आता कतरिना सुद्धा पडणार का बळी?

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण काहींचे नाव त्याच्याशी कायमचे जोडले गेले. यांपैकी 6 अभिनेत्रींसोबत सलमान खानचं नाव जास्त जोडलं गेलं आहे. या अभिनेत्रींसोबत सलमान खानच्या लग्नाच्या अफवाही उठल्या होत्या. परंतु सलमान खानने यांपैकी कोणाशीही सात फेरे घेतले नाहीत. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफही आत लग्न बंधनात कायमी अडकणार आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की, ज्या अभिनेत्रींचे नाव सलमान खानसोबत जोडले गेले होते त्यापैकी बहुतेकांनी सलमानपासुन लांब गेल्यानंतर इंडस्ट्री सोडली आहे.

अशा परिस्थितीत कतरिना कैफही लग्नानंतर इंडस्ट्री सोडेल का? किंवा तिला इंडस्ट्री सोडायला भाग पाडलं जाईल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींची यादी दाखवणार आहोत, ज्या एकेकाळी यशाच्या शिखरावर होत्या पण आता त्या इंडस्ट्रीतून बाहेर पडल्या आहेत.

संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani)

80 च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रत्येक वृत्तपत्रात सलमान खान आणि संगीता बिजलानी यांची नावे येत होती. हे दोघे लग्न करतील असे मानले जात होते पण तसे झाले नाही. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर संगीताने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले आणि इंडस्ट्री सोडली.

सोमी अली (Somy Ali)

सलमान खान 90 च्या दशकाच्या सुरुवातीला अभिनेत्री सोमी अलीला डेट करत होता. सलमान खानसोबत सेटल व्हावे म्हणून सोमी अली पाकिस्तानातून आली होती, पण तसे होऊ शकले नाही आणि ती बॉलिवूड सोडून परदेशात निघून गेली.

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खानचे अफेअर कोणाला ठाऊक नाही. हम दिल दे चुके सनमच्या सेटवर सुरू झालेले त्यांचे प्रेम फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले. ऍशने अभिषेक बच्चनशी लग्न केले आणि आता ती घराची काळजी घेते. ऍश तशी चित्रपटांमध्ये दिसते पण ती इंडस्ट्रीत सक्रिय नाही.

स्नेहा उल्लाल  (Sneha Ullal)

ऍशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने स्नेहा उल्लालला इंडस्ट्रीत संधी दिली. स्नेहा हुबेहुब ऍशसारखी दिसत होती आणि तिचे नाव सलमान खानसोबतही जोडले गेले होते. मात्र, हे दोघेही एकत्र येऊ शकले नाहीत आणि नंतर स्नेहाने चित्रपटांना अलविदा केला.

कतरिना कैफ (Katrina Kaif)

अभिनेत्री कतरिना कैफ या आठवड्यात राजस्थानमध्ये सात फेरे घेणार आहे. कतरिना कैफने अनेक चित्रपट केले आहेत. ती देखील एक सक्रिय अभिनेत्री आहे, पण तरीही ती लग्नानंतर इंडस्ट्रीला अलविदा करेल असे लोकांना वाचत आहे.