विधानसभेतील दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच दिल्लीत नव्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. कुणाकडे जाणार काँग्रेसचं राज्यातील नेतृत्व पाहुयात या खास रिपोर्टमधून..
विधानसभेतील दारूण पराभावानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत लवकरच काँग्रेसच्या श्रेष्ठींची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत राज्यातील नेतृत्व बदलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसमध्ये भाकरी फिरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नाना पटोलेंनी विधानसभेतील पराभवाची जबाबदारी घेत आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पदमुक्त करा अशी विनंती यापूर्वीच केली आहे. त्यामुळे, आता लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल. मात्र, सोबतच आता विधीमंडळ गटनेतेपगाचं नावही दिल्लीतूनच निश्चित होणार आहे
विधानसभेत प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांमध्ये संपर्काचा अभाव होता. त्याचा फटका विधानसभेत बसल्याची तक्रार थेट दिल्लीत राहुल गांधींची भेट घेऊन महिला खासदारांनी केली होती. विधानसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यपदावरून मुक्त करण्याची विनंती नाना पटोलेंनी मल्लिकार्जुन खरगेंकडे केली होती. मात्र, सोबतच आता विधीमंडळ गटनेतेपदाचं नावही दिल्लीतूनच निश्चित होणार आहे.
नाना पटोले यांची विधीमंडळ नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे
प्रदेशाध्यक्षपदासाठी वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजीत कदम यांच्या नावांची दिल्लीत चर्चा आहे
विधानसभेतील पराभवानंतर दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व सूत्र हाती घेतली आहेत. त्यामुळे काँग्रेसची भाकरी फिरणार की आणखी करपणार हे येणारा काळच ठरवणार आहे..