काजोलच्या बहिणीशी बदला घेण्यासाठी 'हा' अभिनेता करत होता घाणेरडं काम

कोण आहे हा अभिनेता 

काजोलच्या बहिणीशी बदला घेण्यासाठी 'हा' अभिनेता करत होता घाणेरडं काम

मुंबई : बिग बॉसमध्ये काजोलची बहिण तनीषा मुखर्जीसोबत रिलेशनशिपमध्ये असलेला अभिनेता अरमान कोहली खूप चर्चेत आहे. अरमानने या शोमध्ये केलेल्या मोठ्या खुलासामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. हा खुलासा कुणी दुसऱ्याने नाही तर स्वतः अरमान कोहलीच्या ड्रायवरने केली आहे. हा खुलासा ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. 

ड्रायवरने सांगितलं की, तनीषा मुखर्जीशी ब्रेकअप झाल्यानंतर अरमान कोहली बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीकडून बदला घेत होता. अरमान कोहलीचे वडिल राजकुमार कोहली यांचा ड्रायवर सोनूने हा खुलासा केला आहे. तनीषासोबत ब्रेकअप केल्यानंतर अरमान कोहली खूप रागात असायचा. तो त्याचा राग तनिषाच्या जवळच्या मंडळींवर काढत असे.  एवढंच काय तर तो राणी मुखर्जीच्या घराबाहेर लघवी करत असेल. त्याला याने काहीही फरक पडत नव्हता. एवढंच काय तर तनीषावर अरमानला कधीही राग आला तर तो असाच राग काढत असे. राणी मुखर्जी आणि तनिषा मुखर्जी या चुलत बहिणी आहेत. तनिषाला त्रास देण्यासाठी तो असं करत असे. 

ड्रायवरने पुढे सांगितलं की, तनीषाने ब्रेकअपच्या अगोदर अरमान कोहलीला कानाखाली मारून निघून गेली होती. यामुळे अरमान बदला घेण्यासाठी अशा घाणेरड्या गोष्टी करत असे. राणी मुखर्जी आणि काजोल चुलत बहिणी आहेत. अरमान कोहली आणि तनीषा मुखर्जी बिग बॉस 7 चे स्पर्धक होते. या शोच्या दरम्यान यांच्यात जवळीक वाढली. यानंतर या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली. 

या दोघांनी त्यावेळी आपलं नातं स्विकारलं नाही पण त्यानंतर अवॉर्ड कार्यक्रमात ते एकत्र दिसले. मात्र काही दिवसानंतर या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली. तनीषाशी ब्रेकअप केल्यानंतर लिव इन पार्टनरमध्ये राहणाऱ्या नीरू रंधावासोबत मारामारी केली. यानंतर नीरूला कोकिलाबेन रूग्णालयात दाखल केलं.