मुंबई : झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी त्यांच्या नात्यामुळे तुफान चर्चेत असतात. इंडस्ट्रीमध्ये कधी कोणाचं नातं कोणासोबत जुळेल हे काही सांगता येत नाही. प्रेम, लग्न, घटस्फोट या गोष्टी झगमगत्या दुनियेत सहज सोप्या आहेत. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडी आमिर अली (Aamir Ali) आणि संजीदा शेख (Sanjeeda Sheikh) यांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. घटस्फोटानंतर आमिरच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये आमिर अभिनेत्री कृष्णा मुखर्जी (Krishna Mukherjee) सोबत दिसत आहे. आमिरने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'दोन वेडी लोकं जेव्हा एकमेकांना भेटतात..' असं लिहिलं आहे.
यावर कृष्णाने कमेंट केली आहे. तिने 'हॅप्पी हग डे' असं लिहिलं आहे. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आमिरच्या पोस्टमुळे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.