घटस्फोटानंतरही आमिर-किरणची मित्राच्या लग्नसमारंभाला एकत्र हजेरी

आमिर खान आणि किरण राव या जोडीने तब्बल 15 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Updated: Sep 19, 2021, 12:31 PM IST
घटस्फोटानंतरही आमिर-किरणची मित्राच्या लग्नसमारंभाला एकत्र हजेरी

मुंबई : आमिर खान आणि किरण राव या जोडीने तब्बल 15 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांसाठी या दोघांचा घटस्फोट हा एक मोठा धक्का होता. दोघांनी एकमेकांच्या समंतीने हा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. आमिर आणि किरण दोघांनी लाईव्ह येत चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देत दोघेही त्यांच्या निर्णयाने खुश असल्याचे सांगितले होते.

३ जुलैला घटस्फोट घेतल्यानंतर अनेकदा हे कपल आमिर खानच्या आगामी लाल सिंग चड्ढा या सिनेमाच्या सेटवर  एकत्र दिसले. त्यानंतर मात्र काही दिवस हे कपल एकत्र दिसलं नाही. 

आता दोघांचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात दोघे मिळून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात दोघांना बोलवण्यात आलं होतं. घटस्फोटानंतरही दोघांमध्ये आजही चांगली मैत्री आहे. त्यामुळे लग्नाला दोघेही एकत्र हजेरी लावणार हे अपेक्षित होते. दोघांनाही एकत्र पाहाताच मीडियाच्या कॅमे-यांनी त्यांचे हे मुव्हमेंट कॅप्चर केले. 

आमिर आणि किरणचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. दोघांमध्ये आजही पूर्वीसारखीच केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळतंय.