घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी Samantha चं दिवाळी सेलिब्रेशन, नागा चैतन्य मात्र नाराज?

घटस्फोटानंतर सामंथा रुथ प्रभूचे दिवाळीचं सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत.

Updated: Nov 7, 2021, 01:01 PM IST
घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी Samantha चं दिवाळी सेलिब्रेशन, नागा चैतन्य मात्र नाराज? title=

मुंबई : घटस्फोटानंतर सामंथा रुथ प्रभूचे दिवाळीचं सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत. साऊथची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने काही दिवसांपूर्वीच सिनेस्टार नागा चैतन्यपासून घटस्फोटाची घोषणा केली होती. यानंतर, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सतत दिसून येत आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दिवाळीचा सणही खास पद्धतीने साजरा केला. 

सामंथा रुथ प्रभू राम चरणच्या दिवाळी पार्टीत पोहोचली होती. वास्तविक, दिवाळी पार्टीत सहभागी होण्यासाठी सामंथा रुथ प्रभू साऊथ सुपरस्टार राम चरणच्या घरी एन्जॉय करताना दिसून आली.

तलाक के बाद ऐसे मनाई Samantha Ruth Prabhu ने दिवाली

राम चरणाच्या पत्नीकडून रिवील

फिल्मस्टार राम चरणची पत्नी उपासना हिने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

Ram Charan की दिवाली पार्टी में गई थीं Samantha Ruth Prabhu

जिथे अभिनेत्री सामंथा फिल्मस्टार राम चरणच्या पत्नीसोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री अगदी आनंदात दिसून येत आहे. ती भूतकाळ मागे टाकत पुढे जाताना दिसत असल्याचं बोललं जात आहे. 

Ram Charan की पत्नी ने खोली पोल

दरम्यान सामंथा आणि नागा चैतन्यची ही एकमेकांशिवाय पार पडलेली पहिली दिवाळी ठरणार आहे.