घटस्फोटानंतर samantha ruth prabhu चा मोठा निर्णय, राहतं घर सोडलं !

असल्याचे बोलले जात आहे.

Updated: Dec 2, 2021, 07:47 PM IST
घटस्फोटानंतर samantha ruth prabhu चा मोठा निर्णय, राहतं घर सोडलं !

मुंबई : साऊथची सुपरस्टार अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू टॉलिवूड सह बॉलिवूडमध्ये ही नेहमीच चर्चा रंगते. लोकप्रिय वेब सिरीज 'द फॅमिली मॅन 2' मध्ये सामंथाने मनोज बाजपेयी विरुद्ध खलनायिकेची भूमिका साकारली होती.

तेव्हापासून सामंथाचे चाहते तिच्या हिंदी पदार्पणाचा अंदाज लावत आहेत. आता असे बोलले जात आहे की सामंथा लवकरच एक हिंदी चित्रपट साईन करू शकते.

खरं तर, सामंथाच्या हिंदी पदार्पणाची चर्चा तिने मुंबईत घर खरेदी केल्यापासूनच वाढली आहे. साऊथसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम करता यावे यासाठी तिने हे केले असल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत सामंथाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ती हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास तयार आहे. ती म्हणाली की कोणतीही भाषा तिच्यासाठी कधीच अडथळा ठरली नाही. पण जोपर्यंत तिला चांगली स्क्रिप्ट मिळत नाही तोपर्यंत ती कोणत्याही चित्रपट साईन करणार नाही.

Samantha Akkineni hasn't signed any Bollywood film as she is 'scared',  would like to work with THIS actor

त्यामुळे सामंथाने अद्याप एकही बॉलीवूड चित्रपट साईन केलेला नसून ती हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यास सज्ज असल्याचे मानले जात आहे.

सामंथाचे चाहते तिला हिंदी चित्रपटात पाहण्याची आतुरतेने वाट पाहत असतील. अलीकडेच सामंथा तिचा पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याने चर्चेत होती.