घटस्फोटनंतर 'या' अभिनेत्री पुन्हा प्रेमात;  काही तर लग्नाशिवायच आई झाल्या

लग्न मोडल्यानंतरही काही अभिनेत्रींचा प्रेमावरचा विश्वास उठला नाही आणि त्यांनी त्यांना दुसरी संधी देत ​​लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा प्रयत्नही केला. 

Updated: May 2, 2022, 02:04 PM IST
घटस्फोटनंतर 'या' अभिनेत्री पुन्हा प्रेमात;  काही तर लग्नाशिवायच आई झाल्या

मुबंई : लग्न मोडल्यानंतरही काही अभिनेत्रींचा प्रेमावरचा विश्वास उठला नाही आणि त्यांनी त्यांना दुसरी संधी देत ​​लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा प्रयत्नही केला. अनेक जोडपी अनेक वर्ष एकत्र राहून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. तर काही एकमेकांपासून वेगळे होतात. मात्र, नातं तुटल्यानंतरही या लोकांचा खऱ्या प्रेमावरचा विश्वास उडल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. चित्रपटसृष्टीतील नायिका टॅबू तोडण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी पतीपासून घटस्फोट घेतला आणि नंतर त्यांच्या आयुष्याला आणखी एक संधी दिली. याचबरोबर या अभिनेत्री प्रेमावर अवलंबून राहून दुसऱ्या लग्नाआधी बॉयफ्रेंडसोबत लिव्हइनमध्ये राहत होत्या.

मलायका अरोरा
या यादीत पहिलं नाव आहे मलायका अरोराचं. अरबाज खानसोबतचं १८ वर्षांचं लग्न मोडल्यानंतर मलायका अरोराने घटस्फोट घेतला आणि आता ती अर्जुन कपूरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय.

काम्या पांजाबी
काम्या पंजाबीचं पहिलं लग्न बंटी नेगीशी झालं होतं. ज्यानंतर तिला एक मुलगी आहे. काम्या आणि बंटीचं लग्न जवळपास १० वर्ष टिकलं आणि 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर काम्याने दिल्लीस्थित घटस्फोटित उद्योगपती शलभ डांग याच्याशी लग्न केलं, त्याला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. काम्या आणि शलभ लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहत होते.

कल्की केकलां
 बॉलिवूड अभिनेत्री कल्की  केकलांने चित्रपट निर्माता अनुराग कश्यपशी लग्न केलं. मात्र, लवकरच दोघंही वेगळे झाले आणि कल्कीने गाय हर्षबर्गला डेट करायला सुरुवात केली. दोघं लिव्ह-इनमध्ये एकत्र राहू लागले आणि लग्न न करता कल्कीने एका मुलीला जन्म दिला.

पूजा बत्रा
अभिनेत्री पूजा बत्रा जहाँ सध्या नवाब शाहसोबत तिचं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. त्याचबरोबर, नवाब शाहच्या आधी, 2002 मध्ये पूजा बत्राने सर्जन सोनू अहलुवालियाशी लग्न केलं, जे फार काळ टिकलं नाही. रिपोर्ट्सनुसार, लग्नापूर्वी पूजा बत्रा आणि नवाब शाह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

दीया मिर्जा
अभिनेत्री दिया मिर्झाने पहिल्यांदाच साहिल संघासोबत घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्याचबरोबर दिया मिर्झाने वैभव रेखीशी लग्न केलं आणि एका मुलाला जन्म दिला. साहिलसोबत लग्नाआधी दीया लिव्ह-इनमध्ये राहत होती. असा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. लग्नापूर्वीच ती गरोदर राहिली होती.

रश्मि देसाई
अभिनेत्री रश्मी देसाईने 2012 मध्ये अभिनेता नंदिश सिंग संधूशी लग्न केलं. मात्र 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर बिड बॉसमध्ये उघड झालं की, रश्मी आणि अरहान इतके जवळ आले आहेत की, तो रश्मीसोबत तिच्या घरी राहू लागला.