मुंबई : लग्नात सात फेरे घेत असताना वधू आणि वर सात जन्म एकत्र राहण्याचे व्रत करतात. एकमेकांना पाठिंबा देण्याचे वचन घेतात. मजबूत नातेसंबंधांमुळे, काही विवाह प्रत्येक निकष पूर्ण करतात आणि दीर्घकाळ टिकतात.
सोबतच काही लग्ने छोट्या-छोट्या गोष्टींवरून एकमेकांच्या मतभेदांमुळे क्षणात तुटतात. काही जोडपे एका क्षणात वेगळे होतात.
युनायटेड अरब अमिरातीमध्ये असाच एक विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये लग्नाच्या काही तासांनंतर वधू आणि वर वेगळे झाले. समोर आलेल्या माहितीनुसार, हे लग्न UAE च्या इतिहासातील सर्वात लहान लग्न ठरले.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेल्या वर्षी देशातील विवाहोत्तर घटस्फोटांची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती.
UAE न्यायमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये UAE मध्ये नोंदवलेल्या 648 घटस्फोटाच्या प्रकरणांपैकी ही प्रकरणे होती.
311 घटस्फोट प्रकरणांमध्ये अमिराती जोडप्यांचा सहभाग असल्याचे डेटावरून दिसून आले. तर 194 स्थलांतरित जोडप्यांनी घटस्फोट घेतला. अहवालानुसार, यूएईमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 4542 विवाहांची नोंदणी झाली आहे.