11 पुरुषांना लिफ्ट देऊन केलं ठार, पाठीवर लिहिलं 'फसवणूक....'; चौकशीत म्हणाला 'मी त्यांच्यासह शारिरीक संबंध...'; पोलीस चक्रावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ज्या पुरुषांची हत्या केली त्या सर्वांशी त्याचे शारिरीक संबंध होते. लिफ्ट दिल्यानंतर त्याने संबंध ठेवले होते.   

शिवराज यादव | Updated: Dec 25, 2024, 07:09 PM IST
11 पुरुषांना लिफ्ट देऊन केलं ठार, पाठीवर लिहिलं 'फसवणूक....'; चौकशीत म्हणाला 'मी त्यांच्यासह शारिरीक संबंध...'; पोलीस चक्रावले title=

पंजाबमध्ये पोलिसांनी एका सीरिअल किलरला अटक केली आहे. या सीरिअल किलरने फक्त 18 महिन्यात तब्बल 11 जणांची हत्या केली आहे. आरोपी पीडितांना लिफ्ट दिल्यानंतर त्यांना लुटत असे. रुपनगर जिल्ह्यातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीची ओळख 33 वर्षीय राम स्वरुप अशी पटली आहे. राम स्वरुप होशियारपूरमधील चौरा गावातील निवासी आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पीडित पुरुष आहेत. आरोपीने लिफ्ट दिल्यानंतर त्यांच्यातील अनेकांसह शारिरीक संबंध ठेवले होते. यानंतर तो त्यांना लुटत असे. यावेळी जर पीडितने पैसे देण्यास नकार दिला किंवा वाद झाला तर आरोपी त्यांची हत्या करत असे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, अनेक प्रकरणात आरोपी कपड्याच्या सहाय्याने गळा दाबत असे. तर काही प्रकरणात डोक्यावर वार झाल्याने मृत्यू झाला आहे. 

एका खुनात, आरोपीने पीडितच्या पाठीवर धोकेबाज' (फसवणूक करणारा) असं लिहिलं होतं. ही पीडित एका खासगी कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा माजी सैनिक होता.

18 ऑगस्ट रोजी टोल प्लाझा मोडरा येथे चहा-पाण्याची सेवा देणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीच्या हत्येप्रकरणी आरोपीला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान सरूपने आणखी 10 जणांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड केली. यापैकी पाच प्रकरणांची आतापर्यंत पुष्टी झाली असली तरी उर्वरित खुनाचा शोध घेण्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

5 एप्रिल रोजी एका 34 वर्षीय ट्रॅक्टर दुरूस्ती करणाऱ्या तरुणाची हत्या, 24 जानेवारी रोजी कारमध्ये सापडलेल्या तरुणाची हत्या यांचा यात समावेश आहे. या सीरियल किलरने रूपनगर, होशियारपूर आणि फतेगड जिल्ह्यांमधील लोकांची हत्या केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मजूर म्हणून काम करणाऱ्या आरोपीला अंमली पदार्थांचे व्यसन होते.

सीरियल किलरने चौकशी सांगितलं आहे की, हत्या केल्यानंतर आपण पश्चाताप म्हणून पीडितच्या पाया पडायचो. दारूच्या नशेतच गुन्हे केल्याची कबुली देताना त्याने आता आपल्याला पीडित कोण होते हे आठवत नसल्याचं सांगितलं आहे.

आरोपीचं लग्न झालं असून त्याला तीन मुलं आहेत. परंतु दोन वर्षांपूर्वी समलैंगिकतेमुळे त्याला त्याच्या कुटुंबाने सोडून दिलं होतं. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल."