बिग बॉस'मधून बाहेर पडताच शमिता शेट्टीने केली लग्नाची घोषणा

'बिग बॉस'मधील आणखी एक जोडी अडकणार लग्न बंधनात...  

Updated: Feb 4, 2022, 04:46 PM IST
बिग बॉस'मधून बाहेर पडताच शमिता शेट्टीने केली लग्नाची घोषणा title=

मुंबई : अभिनेत्री  शमिता शेट्टी 'बिग बॉस'मुळे पुन्हा चर्चेत आली. बिग बॉसच्या घरात तिला प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे अभिनेता राकेश बापटसोबत असलेल्या नात्यामुळे. नुकताचं तिने  स्वतःचा वाढदिवस साजरा केला. तेव्हा तिच्यासोबत राकेश बापट देखील होता. बिग बॉसच्या घारतून  बाहेर आल्यानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. चाहत्यांनी देखील त्यांच्या जोडीला पसंती दर्शवली. यानंतर तुम्ही लग्न कधी करणार? हा प्रश्न देखील चाहत्यांनी अनेकदा विचारला. 

आता शमिताने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. शमिता शेट्टी यांनी 'ई-टाइम्स'शी बोलताना सांगितले की, ती राकेश बापटसोबत असलेल्या नात्यात अत्यंत आनंदी आहे. यंदाच्या वर्षी माझं लग्न होत आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

शमिता पुढे म्हणाली, 'कोरोना महामारीच्या काळात मी किती एकटी झाली आहे, याची जाणीव झाली. मी अविवाहित आहे. आतापर्यंत मी आयुष्य माझ्या स्वतःच्या अटींवर जगले आहे. पण आता कोणीतरी माझ्यासोबत आहे याचा मला आनंद आहे.'

'मला आता लग्न करायचं आहे...' असं देखील  शमिता म्हणाली. सांगायचं झालं तर 'बिग बॉस 15'मधील अभिनेता करण कुंद्राने देखील अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत लग्न करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता शमिताने देखील लग्नाची घोषणा केली.