हाय गर्मी, लग्नानंतर राहुल वैद्यच्या पत्नीने पूलमध्ये लावली आग

गायक राहुल वैद्यने बिग बॉस 14 च्या घरात एन्ट्री घेत  प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं.

Updated: Jul 25, 2021, 12:23 PM IST
हाय गर्मी, लग्नानंतर राहुल वैद्यच्या पत्नीने पूलमध्ये लावली आग

मुंबई : राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि दिशा परमार (Disha Parmar) या नवविवाहीत जोडीची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नुकतंच विवाहबंधानात अडकलेलं हे कपल कधी त्यांच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेत असंत. तर कधी त्यांच्या रिसेप्शनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

गायक राहुल वैद्यने बिग बॉस 14 च्या घरात एन्ट्री घेत  प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. बिग बॉसच्या घरातच त्याने दिशा परमारला आपल्या प्रेमाची कबुली दिली. आणि नॅशनल टेलिव्हिजनवर दिशाला लग्नाची मागणी घातली.
अखेर 16 जुलै रोजी या जोडीने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला बिग बॉसच्या घरातील अनेक स्टार्स दिसून आले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DPV (@dishaparmar)

लग्नानंतरही त्याच्या लव्ह केमिस्ट्रीमुळे आणि दररोज समोर येत असलेल्या पोस्टमुळे हे कपल चर्चेत आहे. राहुलची पत्नी दिशा परमारचा देखील सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्यात आता दिशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात तिचा पुलमधील बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.

दिशाने पुलमध्ये लावली आग

दिशा परमार (Disha Parmar Pool Video) चा हा पूलमधील व्हिडिओ जरी जुना असतला तरी चाहत्यांची या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.  दिशाचा बोल्ड अंदाज सगळ्याच लक्षवेधून घेतो आहे. नवविवाहीत दिशाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील दिशाच्या या व्हिडिओवर कमेंट करत पसंती दर्शवली आहे.